पश्चिम रेल्वेवर रात्रीचा जम्बो ब्लॉक

मुंबई : पश्चिम रेल्वेवर शनिवारी (दि. १० मे) रोजी मध्यरात्री माहीम जंक्शन आणि सांताक्रूझ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर रात्री १ ते ४.३०  वाजेपर्यंत ट्रॅक, सिग्नलिंग सिस्टीम आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या  ब्लॉक दरम्यान, मुंबई सेंट्रल आणि सांताक्रूझ स्थानकांदरम्यान सर्व डाऊन धीम्या मार्गावरील गाड्या डाऊन जलद मार्गांवर चालवल्या जातील. प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्यामुळे आणि प्लॅटफॉर्मची लांबी अपुरी असल्याने या गाड्या महालक्ष्मी, प्रभादेवी आणि माटुंगा रोड स्थानकांवर थांबणार नाहीत, त्यामुळे या गाड्यांना लोअर परळ, माहीम आणि खार रोड स्थानकांवर दुहेरी थांबा देण्यात येईल.



त्याचप्रमाणे, सांताक्रूझ ते मुंबई सेंट्रल/ चर्चगेट दरम्यान अप धीम्या मार्गावरील गाड्या खार रोड स्थानकावर दुहेरी थांबा घेतील आणि प्लॅटफॉर्म नसल्यामुळे माहीम, माटुंगा रोड, प्रभादेवी, लोअर परेल आणि महालक्ष्मी स्थानकांवर थांबणार नाहीत. या ब्लॉकमुळे रविवार, दि. ११ रोजी पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय विभागात कोणताही दिवस ब्लॉक असणार नाही.

Comments
Add Comment

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती