दिल्लीसह देशभरात कडक सुरक्षा व्यवस्था

ऑपरेशन सिंदूर नंतर घेण्यात आला निर्णय


नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूर' नंतर राजधानी दिल्लीसह देशभरातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. भारतीय सैन्याच्या 'ऑपरेशन सिंदूर' नंतर देशभरातील प्रमुख शहरांमध्ये, विमानतळांवर, रेल्वे स्थानकांसह सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारताने आज, बुधवारी पाकिस्तानच्या अनेक ठिकाणावर एअर स्ट्राईक केला. भारताने 'ऑपरेशन सिंदूर'च्या द्वारे 9 दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य करून हवाई हल्ले केले. या कारवाईत शेकडो दहशतवादी ठार झाले असून स्वतः पंतप्रधान मोदी या ऑपेरेशनवर जवळून लक्ष ठेवून होते. पाकिस्तानला यशस्वी प्रत्युत्तर दिल्यानंतर भारताने विविध शहरांमध्ये अतिरिक्त पोलिस कर्मचारी आणि निमलष्करी दल तैनात केले आहेत.


दिल्लीमध्ये देखील ठिकठिकाणी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. आम्ही प्रमुख ठिकाणी अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहेत. दिल्ली पोलिस पूर्णपणे सतर्क आहेत. कोणालाही कायदा आणि सुव्यवस्था भंग करण्याची परवानगी दिली जाणार नाही. सुरक्षा पथके महत्त्वाच्या ठिकाणी कडक नजर ठेवून आहेत आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवत असल्याचे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी

महामार्गावर मोठा अपघात, अवघ्या काही सेकंदात १७ जण होरपळले

चित्रदुर्ग : कर्नाटकमधील चित्रदुर्ग गुरुवारी पहाटे महामार्गावर मोठा अपघात झाला. अवघ्या काही सेकंदात १७ जणांचा

पॅन - आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

३१ डिसेंबरनंतर भरावा लागेल १००० रुपये दंड नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

दोन नव्या विमान कंपन्यांना केंद्र सरकारची मंजुरी

‘इंडिगो’च्या एकाधिकारशाहीला ब्रेक नवी दिल्ली : जेव्हा देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची व्यवस्था