अमृतसरमध्ये ब्लॅकआऊट आणि मॉक ड्रिल, सुरक्षा पथकांना High Alert

अमृतसर : भारताने पाकिस्तानमध्ये अतिरेक्यांच्या विरोधात केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' केल्यानंतर अमृतसरमध्ये ब्लॅकआऊट आणि मॉक ड्रिल करण्यात आले. संपूर्ण पंजाबमध्ये सुरक्षा पथकांना हाय अलर्ट देण्यात आला आहे. सुटीवर असलेल्या सुरक्षा पथकांच्या सदस्यांना तातडीने कामावर परत बोलावण्यात आले आहे. देशव्यापी नागरी संरक्षण सरावाचा एक भाग म्हणून, अमृतसर जिल्हा प्रशासनाने सार्वजनिक सुरक्षा आणि तयारी सुनिश्चित करण्यासाठी ब्लॅकआऊट आणि मॉक ड्रिल केले. नागरिकांना महत्त्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नका आणि रात्री शक्यतो घरातच थांबा असे आवाहन करण्यात आले आहे. बुधवारी ७ मे रोजी रात्री साडेदहा ते अकरा असा अर्धा तास ब्लॅकआऊट करण्यासाठी पूर्ण अमृतसरचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला होता.



दिवसा हवाई हल्ला झाला तर त्याला प्रतिकार करणे हे रात्रीच्या तुलनेत सोपे जाते. यामुळे हवाई हल्ले हे अनेकदा रात्री केले जातात. रात्री हवाई हल्ला करणाऱ्या विमानांना नागरी वस्ती, महत्त्वाच्या इमारती, कारखाने, तेलसाठे आदी दिसू नये यासाठी ब्लॅकआऊट करतात. काळोखामुळे विमानांना शहर पटकन दिसत नाही आणि हल्ला टळण्याची शक्यता वाढते. याच कारणामुळे भारत - पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्राच्या सूचनेनुसार खबरदारीच्या उपायांचा सराव सुरू आहे. नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, हिमाचल प्रदेश आणि बिहारसह अनेक राज्यांमध्ये बुधवारी ब्लॅकआऊट आणि मॉक ड्रिल करण्यात आले. ब्लॅकआऊटसाठी रात्री काही काळासाठी विजेचा पुरवठा खंडीत करण्यात आला होता. देशातील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये हा प्रयोग करण्यात आला. राजधानी नवी दिल्ली, अमृतसर, बाडमेर, सूरत, सिमला, पाटणा आदी शहरांमध्ये रात्री काही काळासाठी विजेचा पुरवठा खंडीत करुन ब्लॅकआऊटचा सराव करण्यात आला.

Comments
Add Comment

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे