पळसाच्या पानांची पत्रावळी जेवणावळीतून झाली हद्दपार!

प्लास्टिक व थर्माकोलच्या पत्रावळींना मोठी पसंती


अनंता दुबेले


कुडूस : विवाह सोहळा, सप्ताह, पूजा व धार्मिक कार्यक्रमात जेवणासाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या पळसाच्या पानांच्या पत्रावळी सध्याच्या आधुनिक युगात हद्दपार झाल्याचे चित्र आता ग्रामीण भागातही सर्रास पहावयास मिळत आहेत. तर आधुनिकीकरणाच्या युगात प्लास्टिक व थर्माकोलच्या पत्रावळींना समाजात अधिक पसंती मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.


विवाह सोहळ्यात व इतर धार्मिक कार्यक्रमात आता पळसाच्या पानाच्या पत्रावळींची जागा थर्माकोल व प्लास्टिक पत्रावळीने घेतली आहे. त्यामुळे स्थानिकांचे पत्रावळी तयार करणे व पळसाची पाने जंगलातून आणून व्यापाऱ्यांना विकणे असा छोट्या खानी रोजगार देणारा व्यवसाय मागणी कमी होत असल्याने जवळजवळ बंदच झाला आहे.



पुरातन काळापासून मंगलकार्याच्या जेवण समारंभासाठी पळसाच्या पानांपासून बनविलेल्या पत्रावळींचा वापर केला जात असे. आयुर्वेदीय गुणधर्म असलेली पळसाच्या पानाची पत्रावळी सध्या लोप पावत असून, शहरातील पानटपरीवालेही सध्या पार्सल मावा पळसाच्या पानात बांधून न देता आता कागद किंवा प्लास्टिकमध्ये बांधून देत असल्याने पळसाच्या पानांची मागणी आपोआपच घटली आहे. परिणामी, जंगल परिसरातील स्थानिकांचा रोजगाराचे साधन असलेला हा व्यवसाय बंद झाल्याचे दिसत आहे.



जेवणाचा स्वाद वेगळाच



  • पळसाच्या पानांनी बनविलेल्या पत्रावळीत जेवणाचा स्वाद अलगच असायचा, असे जुने जाणते वयोवृद्ध नागरिक आजही अभिमानाने सांगत आहेत.

  • कारण पळसाच्या पत्रावळीला आयुर्वेदिक गुणधर्म असल्याने जेवण लवकर पचत असते.

  • अशी विविध गुणधर्म असलेली पळसाच्या पानांची पत्रावळी सध्याच्या स्थितीत हद्दपार झालेली असून, तिची जागा थर्माकोल व प्लास्टिक पत्रावळीने घेतली असल्याचे दिसत आहे.


आदिवासींचा रोजगारही बुडाला


पुरातन काळापासून मंगलप्रसंगी जेवण समारंभासाठी पळसाच्या पानांपासून बनविलेल्या पत्रावळींचा वापर केला जात असे. आयुर्वेदीय गुणधर्म असलेल्या पत्रावळी सध्या लोप पावत असून, पानटपरीवालेही सध्या पार्सल, मावा आदी वस्तू पानात बांधून न देता कागद, प्लास्टिकमध्ये बांधून देत असल्याने पळस पानांची मागणी घटली आणि परिणामी जंगलातील आदिवासींच्या रोजगाराचे साधन बंद झाले आहे.

Comments
Add Comment

ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षण देण्यास विरोध

मुंबई (प्रतिनिधी) : ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने २ सप्टेंबर रोजी

कार्तिकी यात्रेनिमित्त २६ ऑक्टोबरपासून विठुरायाचे २४ तास दर्शन

सोलापूर : कार्तिकी यात्रेनिमित्त २६ ऑक्टोबरपासून श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे २४ तास दर्शन सुरू राहणार आहे.

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त 'गोकुळ'चा नवा रेकॉर्ड, तब्बल इतके लाख दुधाची विक्री

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,(गोकुळ) ने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दूध विक्रीत नवा

अभिजात मराठी भाषा परिषद देशाच्या दृष्टीने महत्त्वाची - उदय सामंत

अमरावती : प्रत्येक भाषेने आपली अस्मिता उभी केली आहे. त्यामुळे ही अस्मिता अखंडपणे पुढे न्यायची असल्यास देशातील

नागपूरच्या दुय्यम निबंधक कार्यालयावर महसूल मंत्र्यांची धाड: लाचखोरी उघड, रोकड जप्त

नागपूर : नागपूरच्या दुय्यम निबंधक कार्यालयात चालणाऱ्या भ्रष्ट कारभारावर लगाम घालण्यासाठी राज्याचे महसूल

कार्तिकी एकादशीला कोण करणार पंढरपूरला विठ्ठलाची पूजा, शिंदे की पवार?

सोलापूर : दरवर्षी परंपरेनुसार आषाढी एकादशीला राज्याचे मुख्यमंत्री पूजा करतात. राज्याला उपमुख्यमंत्री असले तर