‘शाळा बंद’ धोरणाविरुद्ध उच्च न्यायालयात आव्हान

हायकोर्टाने बजावली शिक्षण विभागास नोटीस


अमरावती : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ अन्वये महाराष्ट्र शासनास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील कमी पटसंख्येचे कारण पुढे करून शिक्षक पदे कमी करणे अथवा शाळा बंद करणे असे धोरण राबविता येणार नाही. या संदर्भातील जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालय यांच्या कोल्हापूर येथील खंडपीठासमोर सुनावणी झाली. न्यायमूर्ती माधव जामदार व न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांनी महाराष्ट्र शासनासह सर्व प्रतिवादींना नोटीस बजावून २ एप्रिलपूर्वी आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

निवृत्त उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तानाजी नलवडे तसेच महाराष्ट्र राज्याचे निवृत्त शिक्षण संचालक महावीर माने यांनी दाखल केलेल्या या जनहित याचिकेत, बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ ची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी शासनाची असल्याचे नमूद करण्यात आले आहे. प्रत्येक विद्यार्थ्यास दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी अधिक सोयी सुविधा उपलब्ध करून देणे अपेक्षित असताना, कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये कंत्राटी धोरण राबवून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होत असल्याचे याचिकेत स्पष्ट करण्यात आले आहे.

जनहित याचिकेत शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार प्रत्येक वर्गासाठी किमान एक शिक्षक अनिवार्य असावा, सर्व शाळांना पुरेशा भौतिक सुविधा उपलब्ध कराव्यात, २५ टक्के प्रवेश आर्थिक मागास विद्यार्थ्यांसाठी राखीव असून, अशा विद्यार्थ्यांकडून विनाअनुदानित खाजगी शाळांनी कोणताही आगाऊ निधी किंवा शुल्क आकारू नये. बंद असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्या इमारतींचे कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेकडे हस्तांतरण करू नये. बाल हक्क संरक्षण आयोगाने आपली वैधानिक जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, आदी विद्यार्थी हिताच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. याचिकाकर्त्यांच्या वतीने ऍड. अहिल्या नलवडे, ऍड. उमाकांत वाघमारे, ऍड. सुमीत धनवडे, ऍड. मोहन चव्हाण, ऍड. विश्वजित नलवडे, ऍड. लक्ष्मण पाटील आणि ऍड. श्रेयस सामंत हे काम पाहत आहेत.

Comments
Add Comment

Nitin Gadkari : पुणे ते संभाजीनगर २ तासांत, तर मुंबई-बंगळुरू अवघ्या ५ तासांत! नितीन गडकरींनी मांडला महामार्गांचा 'मास्टर प्लॅन'

पुणे : महाराष्ट्रातील रस्ते वाहतूक व्यवस्था अधिक गतीमान करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री

History of Ukadiche Modak : गणपती बाप्पा आणि मोदकाचं अतुट नातं! काय आहे उकडीच्या मोदकाचा पौराणिक आणि रंजक इतिहास?

मुंबई : गणेशोत्सव असो वा संकष्टी चतुर्थी, गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी 'मोदक' हा अग्रस्थानी असतो. लहानपणापासूनच

Auto Driver Marathi Test : ७ हजार ७५० रिक्षाचालक मराठी परीक्षेत नापास, ३० दिवसांची अंतिम मुदत

मराठी शिकण्यास टाळाटाळ करणाऱ्यांचे परमिट रद्द करणार मुंबई : राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी लागू करण्यात

Bhimashankar Accident : भीमाशंकर महामार्गावर भीषण अपघात; 2 रिक्षांना कारची धडक, 12 जण गंभीर जखमी

पुणे : श्रावण महिना, वीकेंडची सुट्टी आणि सोमवार असल्याने 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर

Pune Crime : पुण्यात रीलस्टार तरुणीचा 19 वर्षीय तरुणावर हल्ला; दोन तरुणींसह तिघांना अटक

पुणे :  पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरात किरकोळ वादातून 19 वर्षीय तरुणावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली

Maharashtra Weather : पावसाची प्रतीक्षा कायम! कोकण-घाटमाथा वगळता राज्यात जोरदार सरींची शक्यता कमी

मुंबई : ऑगस्टचा पंधरवडा संपत आला असतानाही महाराष्ट्रातील अनेक भागांत अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नाही.