

दहशतवादाला कुठेही स्थान नाही, इराणच्या राष्ट्रपतींनी पंतप्रधान मोदींना केला फोन
नवी दिल्ली: इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूज पेजेश्कियान यांनी शनिवारी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध ...
भारतात २०२२ मध्ये वाघांची मोजणी अर्थात व्याघ्रगणना झाली. या व्याघ्रगणनेनुसार भारतात तीन हजार १६७ वाघांची नोंद झाली. राज्यात २०१८ मध्ये ३१२ वाघांची नोंद झाली होती. यानंतर २०२२ च्या व्याघ्रगणनेत महाराष्ट्रात ४४४ वाघांची नोंद झाली. व्याघ्र संवर्धनात आघाडी घेतलेल्या महाराष्ट्रात व्याघ्र मृत्यूची संख्याही वाढली आहे.

पहलगाम हल्ल्याचा तपास करणार NIA, गृह मंत्रालयाने दिली जबाबदारी
नवी दिल्ली: केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास राष्ट्रीस तपास यंत्रणेकडे सोपवला आहे. गृहमंत्रालयाने ...
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात जानेवारी २०२५ पासून २६ एप्रिलपर्यंतच्या चार महिन्यांत ६२ व्याघ्रमृत्यू झालेले आहेत. यापैकी महाराष्ट्रात २० आणि मध्य प्रदेशात १७ व्याघ्रमृत्यू झाले आहेत. हे मृत्यू प्रामुख्याने वन्यजीवांच्या झुंजीत, अपघातात, शिकार अथवा नैसर्गिक कारणामुळे झाले आहेत.
महाराष्ट्रात मागील पाच वर्षात ४१ वाघ आणि ५५ बिबट्यांची शिकार झाली आहे. ही आकडेवारी जानेवारी २०२५ पर्यंतची आहे. मागील पाच पाच वर्षात शिकाऱ्यांनी देशभरात बेकायदेशिररित्या १०० पेक्षा जास्त वाघांची शिकार केली आहे. यातील काही प्रकरणांचा तपास सुरू आहे तर काही प्रकरणांमध्ये कायदेशीर कारवाई सुरू आहे. आता ऑक्टोबर २०२५ मध्ये नव्या व्याघ्रगणनेची सुरुवात होण्याची शक्यता आहे. अद्याप याबाबत घोषणा झालेली नाही. पण तयारी सुरू असल्याचे वृत्त आहे.