Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यात सुरक्षा यंत्रणांची चूक; सर्वपक्षीय बैठकीत केंद्राची कबुली

नवी दिल्ली : काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याने देश हादरून गेला असतानाच, केंद्र सरकारने या प्रकरणात पहिल्यांदाच सुरक्षेतील गाफीलपणाची कबुली दिली आहे. या हल्ल्यात २८ निष्पाप नागरिकांचा बळी गेला असून, एकही दहशतवादी वाचणार नाही, अशी ठाम भूमिका केंद्राने मांडली आहे.


आज दिल्लीमध्ये झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी या हल्ल्याबाबत सविस्तर माहिती दिली. “या घटनेत सुरक्षा यंत्रणांकडून चूक झाली असून तिचे गांभीर्याने परीक्षण सुरू आहे,” असे त्यांनी स्पष्टपणे मान्य केले. बैठकीत उपस्थित सर्व पक्षांनी सरकारच्या कारवाईला पाठिंबा दर्शवला आणि दहशतवादाच्या विरोधात एकजुटीने लढण्याचे आश्वासन दिले.



गेल्या काही वर्षांपासून जम्मू-काश्मीरमध्ये परिस्थिती स्थिर होती. पर्यटन, व्यवसाय आणि सामान्य जीवन सुरळीत सुरू होते. मात्र पहलगाम हल्ल्याने पुन्हा एकदा दहशतीचा चेहरा समोर आला. बैठकीत अनेक नेत्यांनी ही परिस्थिती बदलण्याची गरज अधोरेखित केली.


हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानविरोधात काही धोरणात्मक निर्णय घेतले, त्यात सर्वात ठळक म्हणजे चिनाब नदीचे पाणी थांबवणे. भारतातून पाकिस्तानकडे जाणाऱ्या पाण्याचा प्रवाह रोखण्यात आला असून, त्यासंबंधीचे फोटो आणि व्हिडिओही समोर आले आहेत.


दरम्यान, भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तान सरकारनेही तत्काळ आपत्कालीन बैठक घेतली. यामध्ये पाकिस्तानने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. पाकिस्तानने भारतासाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. पाकिस्तानने भारतासोबतचे व्यापार पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्ताने देखील त्यांच्या येथील भारतीय उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांना भारतात जाण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तानने भारताप्रमाणेच अटारी-वाघा बॉर्डर बंद करण्याचा निर्णय घेतला. तर पाकिस्तानमधील भारतीयांचे व्हिसा रद्द केले आहेत. तसेच त्यांना भारतात परतण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

भारत-चीन संबंधांमध्ये सकारात्मक बदल; लष्करप्रमुखांनी दिली महत्वाची माहिती

नवी दिल्ली : भारत-चीन सीमावर्ती तणावाबाबत गेले काही महिने सकारात्मक घडामोडी घडत असल्याचे लष्करप्रमुख जनरल

फाशीच्या शिक्षेवर बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनांची प्रतिक्रिया

ढाका - बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना युनुस सरकारने स्थापने केलेल्या आंतरराष्ट्रीय गुन्हे

बिहारमध्ये नव्या सरकारच्या हालचालींना वेग; २२ नोव्हेंबरपूर्वी शपथविधीची शक्यता

पटना : बिहारमध्ये नवं सरकार येत्या २२ नोव्हेंबरपूर्वी स्थापन होईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री आणि एलजेपीचे

Mumbai CNG Cut : मुंबईत CNGचा मोठा तुटवडा, रिक्षा-टॅक्सी वाहतूक ठप्प; मुंबईकरांचे प्रवास नियोजन कोलमडण्याची शक्यता

वडाळ्यातील गेल पाईपलाईन बिघाडामुळे मुंबईत सीएनजी टंचाई मुंबई : वडाळा परिसरातील गेल गॅसच्या मुख्य

लाल किल्ला स्फोट प्रकरणाचा कट रचणाऱ्या दहशतवाद्याला अटक! कोण आहे आमिर रशीद अली?

दिल्ली: दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात झालेल्या कार बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेला मोठे यश

केएफसी आणि मॅकडोनाल्डसारखे फूड ब्रॅण्ड रेल्वेस्थानकांवर उघडणार

रेल्वेने त्यांच्या केटरिंग धोरणात केला मोठा बदल नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने त्यांच्या केटरिंग धोरणात एक मोठा