सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : गेल्या तीन वर्षांपासून चिपी विमानतळाच्या ठिकाणी असलेल्या विद्युतीकरणाच्या समस्या आता मार्गी लागणार आहेत. विमानतळावरील विद्युतीकरणाच्या समस्यांसहीत लाईन शिफ्टिंग व रूपांतरणाच्या कामासाठी जिल्हा नियोजनामधून दोन कोटी ३७लाख ५७ हजार रुपयांच्या खर्चाच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामुळे नाईट लैंडिंगची समस्या सुटणार आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानुसार ही कार्यवाही करण्यात आली आहे. चीपी विमानतळाकरिता एमएससीबीने प्रशासकीय मान्यता दिली आहे.
चिपी विमानतळासाठी वीन पुरवठा करण्याच्या अनुषंगाने महावितरणच्या अधीक्षक अभियंत्याने सादर केलेल्या प्रस्तावाला जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. वेंगुर्ला तालुक्यातील पाट फिडरकडून जाणाऱ्या ११ केव्ही लाईनच्या शिफ्टिंग व रूपांतरणासाठी सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७लाख ५७ हजारांचा निधी मंजूर करण्यात आला होता. पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानुसार जिल्हा नियोजनमधून या कामासाठी निधी उपलब्ध करण्यात आला आहे.
चिपी विमानतळ सुरू होऊन तीन वर्षे उलटून गेली तरी या ठिकाणी नाईट लौडंगचा प्रश्न रेंगाळला होता. यासाठी वीज कंपनीच्या पाट येथील फिडरकडून वीज पुरवठा होत असताना ११ केव्हीच्या मुख्य लाईनच्या शिफ्टिंगसाठी मोठा खर्च होता. पालकमंत्री नितेश राणे यांनी पुढाकार घेऊन जिल्हा नियोजन समितीमधून यासाठीचा निधी देऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला. यात अंतर्गत विद्युतीकरण, वाढीव पथदिवे, अंतर्गत उच्ब दाबाच्या वीजवाहिन्या, लघुदाबाच्या विजवाहिन्या उभारणे, नवीन रोहित्र रोहित क्षमता वाढवणे आदी कामांचा समावेश आहे.
चिपी विमानतळावरून विमानसेवा सुरू झाली तरी आवश्यक विद्युतीकरणाच्या अभावामुळे नाईट लैंडिंगचा मोठा प्रश्न होता, मात्र, आता विजेची समस्या मिटविण्यासाठी निधी मंजूर झाल्यामुळे भविष्यात येथील नाईट लैंडिंगचा प्रश्न मिटण्यास मदत होणार आहे.
बंद विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न चिपी विमानतळावर बंद असलेली विमानसेवा सुरू करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी फ्लाय ९१ च्या अधिका-यांशी सोमवारी मंत्रालयातील आपल्या दालनात बैठक घेतली होती. त्यानंतर लगेचच दुस-या दिवशी येथील विजेची समस्या मिटविण्यासाठीच्या कामालाही प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आत्ता चिपी विमानतळावरून जास्तीत जास्त विमानसेवा सुरू करण्यासाठी मंत्री नितेश राणे प्रयत्नशील आहेत.
निर्बीजीकरण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन - वन मंत्री गणेश नाईक मुंबई : कोकणातील फळबागा आणि…
गागोदे खुर्द अनुसूचित जातीसाठी, १४ ग्रामपंचायतीत आदिवासी सरपंच पेण (वार्ताहर) : पेण तालुक्यातील ६४ ग्रामपंचायत…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स…
राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती नवी दिल्ली : मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगतोय. मात्र…
मुख्यालयातील उपस्थितीचे महसूल विभागाचे काटेकोर आदेश मुंबई: महसूल विभाग जनतेच्या सेवेसाठी असून जनसेवेत कसूर करणाऱ्या…