मुंबई : हिंदी भाषा सक्ती विरोधात राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. नविन शिक्षण धोरणाचा अवलंब करीत राज्य शासनाने शिक्षण आराखड्याचा स्वीकार केला असून त्रिभाषा सूत्र लागू करत हिंदी विषय राज्यात सक्तीचा केलेला आहे. हिंदी भाषा सक्ती विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने शुक्रवारी हिंदी माध्यमातील पाठ्यपुस्तके जाळून निषेध करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी घाटकोपर पोलिसांनी हे आंदोलन वेळीच रोखून आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्याला अटक केले. मनविसेचे घाटकोपर सचिव अभिषेक सावंत यांनी कार्यकर्त्यांसह हिंदी माध्यमातील पाठ्यपुस्तके हातात घेत घोषणा बाजी केली. यावेळी कार्यकर्त्यांनी हिंदी भाषेतील पाठ्यपुस्तके जाळून निषेध करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी वेळीच कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
त्रिभाषा सूत्रानुसार राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी विषय सक्तीचा करण्याच्या महायुती सरकारच्या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रखर विरोध दर्शवला आहे. राज्य सरकार हिंदीची सक्ती करून मराठी भाषा संपवण्याचा डाव साधत आहे. आज आम्ही प्रतिकात्मक आंदोलन करत असताना पोलीस आमचे आंदोलन दडपत असल्याचे मनविसेचे सचिव अभिषेक सावंत यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.
मुंबई : कधी मराठी - अमराठी तर कधी भूमिपुत्रांचे हक्क तर कधी उद्धव - राज…
जम्मू-काश्मीरसह उत्तर भारत हादरले काबूल : अफगाणिस्तान-ताजीकिस्तान सीमावर्ती भागात शनिवारी (दि. १९) भूकंपाचे तीव्र धक्के…
कोलकाता : वक्फ दुरुस्ती विधेयकावरून पश्चिम बंगालमध्ये उसळलेल्या हिंसाचारावर भाजप नेते आणि सुप्रसिद्धी अभिनेता मिथुन…
नाशकात दुपारी १ ते ४ दरम्यान ट्रॅफिक सिग्नल राहणार बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय! नाशिक :…
नेटकऱ्यांनी केला कमेंट्सचा पाऊस मुंबई: सध्या मराठी कलाविश्वात सई ताम्हणकरच्या ‘आलेच मी’ या लावणीची जोरदार…
बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याला हक्काचे पाणी मिळवून देण्याचे तसेच गहिनीनाथ गडाला…