बहुप्रतिक्षित गारगाई धरणाच्या कामाला गती; तब्बल १.२ मेगावॅटर वीज निर्मिती प्रकल्पही उभारणार

मुंबई: गारगाई नदीवर प्रस्तावित धरण प्रकल्पाच्या कामाला आता गती देण्यात येणार असून या धरण प्रकल्पाच्या कामासाठी महापालिकेच्यावतीने कंत्राटदाराची नेमणूक करण्यात येत आहे. याबाबतचा प्रस्ताव आता स्थायी समितीच्या सभेपुढे प्रशासनाच्यावतीने मांडण्यात आला आहे. या धरणातून मुंबईला ४४० दशलक्ष लिटर एवढ्या पाण्याची वाढ होणार आहे. पुढील दोन वर्षांत या धरणाचे बांधकाम पूर्ण केले जाणे अपेक्षित आहे.या धरण प्रकल्पाची उभारणी करताना या प्रकल्पातून किमान १.२ मेगावॅट वीज निर्मिती करण्यात येणार आहे.


मुंबई महापालिकेच्यावतीने मागील अनेक वर्षांपासून बहुप्रतिक्षेत असलेल्या गारगाई प्रकल्पासाठी सुमारे ६७ मीटर उंच आणि सुमारे ७०० मीटर लांबीचे रोलर कॉम्पॅक्टेड काँक्रीट तंत्रज्ञानावर आधारित धरण उभारण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाच्यावतीने घेण्यात आला आहे. या धरणाचे बांधकाम २.२ मीटर व्यासाचा आणि सुमारे १.६ किलोमीटर लांबीचा जलवाहन बोगदा बांधण्यात येणार असून त्यामध्ये पाच रेडियल गेट्ससह स्पिलवे, स्टॉपलॉग, टर्बाइन तसेच अंतर्गत काँक्रीट रस्ते आणि पूल यांचा समावेश असेल. या प्रकल्पातून किमान १.२ मेगावॅट वीज निर्मिती करण्याची तरतूद करण्यात आली आहे.


बांधकामाच्या काळात नदीचा प्रवाह वळविण्यासाठी दोन टप्प्यांत कॉफर डॅम उभारले जाणार आहेत. तसेच धरणाच्या भागात भूगर्भीय तपासणीसाठी किमान २० बोअरहोल घेऊन सविस्तर जिओटेक्निकल तपासणी करण्यात येणार आहे. भूजल पातळीवर लक्ष ठेवण्यासाठी पीझोमेट्रिक ट्यूब बसविण्याचीही योजना आहे. याशिवाय प्रकल्प क्षेत्रात कंटूर सर्वेक्षण व टोटल स्टेशन सर्वेक्षण करण्यात येणार आहे.


प्रकल्पात नदीवरील स्लूइस, इन्टेक वेल, गाईड वॉल, डिव्हाईड वॉल, ग्लेसिस काँक्रीट, स्टिलिंग बेसिन, स्लोपिंग एप्रॉन, सबमर्सिबल बॉक्स गिर्डर ब्रिज यांसारख्या विविध बांधकाम होणार आहे. तसेच धरण परिसरात पाच मार्गिकांसह पूल, क्रॉस ड्रेनेज व्यवस्था आणि उतार स्थिरीकरणाची कामेही करण्यात येणार आहेत. तसेच या प्रकल्पात सुमारे ३.१० लाख झाडे बाधित होणार आहेत. या बाधित झाडांचे वृक्षरोपण तसेच पुनर्राेपण करण्याची जबाबदारी महापालिकेची असणार आहे.


दरम्यान, प्रकल्पासाठी वन, पर्यावरण व वन्यजीव विषयक आवश्यक परवानग्या घेण्यासाठी संबंधित विभागांशी समन्वय साधला जाणार असून केंद्र व राज्य शासनाच्या विविध प्राधिकरणांकडून आवश्यक मंजुरी घेऊनच प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे महापालिका जल विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पामध्ये धरण बांधकामासोबतच जलवाहन बोगदा, वीज निर्मिती व्यवस्था, पूल, रस्ते आणि इतर पूरक संरचनांची उभारणी करण्यात येणार आहे.


या प्रकल्प कामासाठी महापालिकेच्यावतीने सोमा इंटरप्रायझेस या कंपनीची निवड करण्यात आली. महापालिकेच्या कार्यालयीन अंदाजापेक्षा दहा टक्के अधिक बोली लावणारी कंपनी पात्र ठरली असून या कामासाठी विविध करांसह ५४०० कोटी रुपये एवढा खर्च केला जाणार आहे.

Comments
Add Comment

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत

Nagpur citizens : काठमांडूमधील नागपूरचे ११० नागरिक सुरक्षित; भारताकडे रवाना

नेपाळमधील काठमांडू येथे गेलेले नागपूर जिल्ह्यातील ११० नागरिक सुरक्षित नागरिकांच्या परतीच्या प्रवासासाठी

Eknath Shinde : राखीच्या धाग्यातून महिलांना मोठी ग्वाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ‘लाडक्या बहिणीं’ना आश्वासन

राखीच्या धाग्यातून महिलांच्या सर्वांगीण विकासाचा शब्द - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही माविम आणि उमेद

Central Railway : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; मुंबई-मडगांव दरम्यान ४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या धावणार

Mumbai : गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्

Mumbai Indians : मुंबईत उतरलं ‘मुंबई इंडियन्स’चं खास विमान; Malaysia Airlinesच्या A330ची पहिली लँडिंग, क्रिकेट चाहत्यांना सुखद धक्का

मुंबई : मुंबई इंडियन्सच्या निळ्या-गोल्डन रंगांनी सजलेलं Malaysia Airlinesचं खास Airbus A330-300 विमान बुधवारी, २६ ऑगस्ट रोजी मुंबईत

Devendra Fadnavis : 'एमपीएससी' पेपरफुटीप्रकरणी कोणालाही सोडणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)