प्रवेशमार्गांवर घडणार मुंबईची ओळख

सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक  संकल्पनांवर आधारित असेल प्रवेशद्वार महापौरांनी तिन्ही प्रवेशमार्गांची केली पाहणी


मुंबई : मुंबई महानगरात प्रवेशाच्या मार्गावर, मुंबईची ओळख सांगणारे संकल्पना आधारित असे प्रवेशद्वार आणि घड्याळ मनोरा उभारताना हे सर्व प्रवेशद्वार मुंबईशी संबंधित सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक इत्यादी संकल्पनांवर आधारित असतील. तसेच या प्रवेशद्वारांच्या आजूबाजूला हरितक्षेत्र आणि उद्याने, वाहनतळ सुविधा, महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र आणि वातानुकूलित प्रसाधनगृह, विश्राम कक्ष, त्याचप्रमाणे कोळी बांधव आणि महिला बचत गट आदींना आणि इतर व्यावसायिकांना दालन थाटता येईल अशी जागा, डिजिटल होर्डिंग त्याचप्रमाणे सौरऊर्जा प्रकल्प असे सर्व समावेशक संकुल (हब) निर्माण केले जाणार आहे.


मुंबईच्या प्रवेश द्वारवर घड्याळ मनोरे उभारणीची मागणी केल्यानंतर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी मंगळवारी सकाळी याला गती देण्यासाठी वाशी नाका, ऐरोली नाका आणि मुलुंड नाका या तीन ठिकाणी  भेट देवून प्रत्यक्ष जागांची पाहणी केली. प्रवेशद्वार ही केवळ कमानी पुरती मर्यादित संकल्पना नसून त्या सोबतीला सर्व नागरी सेवा-सुविधा युक्त संकुल विकसित करणे, त्यातून नागरिकांना आणि पर्यटकांना सर्व सुविधा मिळवून देणे तसेच महानगरपालिकेचा महसूल वाढवणे हाही उद्देश आहे. त्यादृष्टीने कालबद्ध आखणी करून प्रशासनाने कामकाजाला लागावे. या प्रकल्पाला गती देण्यासाठी लवकरच सर्व संबंधित खात्यांसमवेत संयुक्त बैठक आयोजित करण्यात येईल, असे या दौऱ्यावेळी महापौर  रितू तावडे यांनी नमूद केले.


प्रारंभी, वाशी नाका, त्यानंतर ऐरोली नाका आणि अखेरीस मुलुंड नाका या ठिकाणी महापौर श्रीमती रितू तावडे यांनी पाहणी केली. याप्रसंगी त्या म्हणाल्या की, यापूर्वी दहिसर नाका येथे पाहणी दौरा केला होता. त्यानंतर आज या तिन्ही ठिकाणी पाहणी केली आहे. मुंबईतील चारही प्रवेश मार्गांवर प्रवेशद्वार आणि घड्याळ मनोरा उभारावयाचा आहे. पण ही संकल्पना फक्त कमानी उभारण्यापुरती मर्यादित नाही. मुंबईमध्ये प्रवेश करणारे नागरिक, अभ्यागत, पर्यटक यांना या प्रवेशद्वारांमधून मुंबईची ओळख जाणवली पाहिजे. त्यामुळे हे सर्व प्रवेशद्वार मुंबईशी संबंधित सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक इत्यादी संकल्पनांवर आधारित असतील. तसेच या प्रवेशद्वारांच्या आजूबाजूला हरितक्षेत्र आणि उद्याने, वाहनतळ सुविधा, महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र आणि वातानुकूलित प्रसाधनगृह, विश्राम कक्ष, त्याचप्रमाणे कोळी बांधव आणि महिला बचत गट आदींना आणि इतर व्यावसायिकांना दालन थाटता येईल अशी जागा, डिजिटल होर्डिंग त्याचप्रमाणे सौरऊर्जा प्रकल्प असे सर्व समावेशक संकुल (हब) निर्माण करावयाचे आहे. या संकुलाच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेला कायमस्वरूपी महसूल प्राप्त होईल, हाही यामागचा उद्देश आहे, असे महापौरांनी नमूद केले.


सर्व ठिकाणी स्थळ पाहणी पूर्ण झाली असून आता प्रस्ताव तयार करून त्याला गती देण्यासाठी सर्व संबंधित खात्यांची लवकरच बैठक आयोजित करणार आहे. कालबद्ध आखणी करून हा प्रकल्प पूर्ण करावयाचा आहे. त्यामुळे सर्व संबंधित खात्यांनी आपापल्या संकल्पना आणि परिपूर्ण माहितीसह उपस्थित रहावे, असे निर्देशही महापौर रितू तावडे यांनी यावेळी दिले.


सहआयुक्त (परिमंडळ ५) देविदास क्षीरसागर, उपआयुक्त (उद्याने) अजितकुमार आंबी, महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कांदळवन कक्ष)एस. व्ही. रामाराव, एम पूर्व विभागाचे सहायक आयुक्त उज्ज्वल इंगोले, टी विभागाच्या सहायक आयुक्त योगिता कोल्हे यांच्यासह महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, वनविभाग आणि सर्व संबंधित यंत्रणांचे अधिकारी या पाहणी दौऱ्यास उपस्थित होते.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रात हवामान बदलले; रविवारी काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट, शेतकऱ्यांची चिंता वाढली

मुंबई : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसाने चांगलीच विश्रांती घेतली आहे. राज्यातील अनेक भागांत

Bhuleshwar Ganpati Incident : मुंबईत २२ फूट उंच गणेशमूर्ती कोसळली; २ जणांचा मृत्यू, ५ जखमी

मुंबई : मुंबईच्या दक्षिण मुंबईतील भुलेश्वर परिसरात गणेशमूर्तीच्या आगमनादरम्यान मोठा अपघात झाला. तब्बल २२ फूट

FDA : राज्यातील १३ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित

मुंबई : अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने

Police Dog Retirement : राज्य सरकारचा निर्णय! 10 वर्षे सेवा केल्यानंतरही पोलीस श्वान पोलिसांसोबतच राहणार

मुंबई : पोलीस दलात तब्बल 10 वर्षे सेवा बजावणाऱ्या श्वानांच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्याबाबत मुख्यमंत्री

Vile Parle Hit and Run : 15 वर्षांच्या मुलीला भरधाव बाईकने उडवलं, विलेपार्ले येथील हिट अँड रन प्रकरण

मुंबई : मुंबईतील विलेपार्ले पश्चिम परिसरात हिट अँड रनची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिठीबाई कॉलेजजवळील एन. एस.

Indian Railway : तिकीट बुक करताना करा फक्त एक सेटिंग; अतिरिक्त पैसे न देता होऊ शकते कोचची अपग्रेडेशन!

मुंबई : भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ऑटो-अपग्रेडेशन