भारतीय क्रिकेट संघाचा महापालिकेच्या वतीने नागरी सत्कार

 शिवसेना महापालिका गटनेते अमेय घोले यांनी केली महापौरांकडे मागणी


मुंबई : भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाने आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत तिसऱ्यांदा आणि सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावल्याबद्दल मुंबई महानगरपालिकेतर्फे संघाचा भव्य नागरी सत्कार करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना नगरसेवक व महापालिका गटनेते अमेय घोले यांनी केली आहे.


यासंदर्भात घोले यांनी १० मार्च २०२६ रोजी महापौरांना पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत विजेतेपद मिळवत इतिहास घडवला आहे. तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावताना सलग दुसऱ्यांदा ही कामगिरी केल्याने देशाचे नाव संपूर्ण जगभरात उंचावले आहे. भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ, जिद्द आणि संघभावनेच्या जोरावर ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली असून हा क्षण प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


या ऐतिहासिक विजयामुळे देशभरातील क्रीडाप्रेमींमध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः तरुण पिढीसाठी हा विजय प्रेरणादायी ठरणार असल्याचेही चव्हाण यांनी पत्रात नमूद केले आहे.


मुंबई ही देशाची क्रीडानगरी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे अशा ऐतिहासिक यशाचे औचित्य साधून मुंबई महानगरपालिकेतर्फे भारतीय क्रिकेट संघाचा भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. यामुळे मुंबईकरांना भारतीय संघाच्या या मोठ्या यशाचा गौरव करण्याची संधी मिळेल, असेही त्यांनी सांगितले. याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी विनंतीही घोले यांनी महापौरांना केली आहे.

Comments
Add Comment

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Indian Railway : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! स्टेशनवर थुंकणे, कचरा टाकणे आता महागात पडणार; थेट ₹१,००० दंड

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे स्थानक किंवा परिसरात अस्वच्छता

Mumbai Parelcha Maharaja : परळच्या महाराजाच्या आगमन मिरवणुकीत विजेच्या खांबाला आग; भाविकांमध्ये एकच घबराट  

Mumbai : मुंबईत आगामी गणेशोत्सवाचा उत्साह आता पुरेसा शिगेला पोहोचला असून, शनिवारी पार पडलेल्या 'परळचा महाराजा' आणि