नाशिक : डीजेचा आवाज सहन न झाल्याने युवकाचा मृत्यू!

नाशिक : आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवरती सुरू असलेल्या डीजेचा आवाज सहन न झाल्याने पंचवटीतील फुलेनगर येथे एका २३ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या परिसरात आंबेडकर जयंती वरती शोककळा पसरली आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात सध्यातरी अकस्मात मृत्यूचा गुन्हा हा दाखल करण्यात आलेला आहे. नाशिक शहरामध्ये सातत्याने डीजे व नेत्रदीपक लाईट विविध समारंभांमध्ये वापरण्याची जणू फॅशनच झाली आहे. अलीकडच्या काळामध्ये याला काहीसा ब्रेक लागलेला होता. परंतु पुन्हा अशी फॅशन बनू पाहत आहे. अलीकडच्या काही समारंभांमध्ये सातत्याने डीजे व फॅशनेबल लाईटचा वापर हा वाढला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरती देखील त्याचा विपरीत परिणाम होत आहे.


अशीच घटना पुन्हा एकदा नाशिकमध्ये घडली आहे. या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, प्रथेप्रमाणे आंबेडकर जयंतीच्या आदल्या दिवशी म्हणजे १३ तारखेला रात्री शहरातील आंबेडकर पुतळ्याजवळ वाद्य वाजवून रात्री बारा वाजेच्या सुमारास अभिवादन केले जाते. मुख्यसमारोह हा शिवाजी गार्डन जवळील आंबेडकर पुतळाजवळ होत असतो. मात्र, शहरातील विविध उपनगरांमध्ये असलेल्या आंबेडकर पुतळ्याजवळ स्थानिक मित्र मंडळाकडून अशा स्वरूपाचे कार्यक्रम घेतले जातात.



मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास पंचवटी परिसरात असलेल्या फुलेनगर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ डीजे वाजवून फॅशनेबल लाईटचा वापर करून मोठ्या प्रमाणावरती उत्सव साजरा केला जात होता. पण या ठिकाणी उत्सवाचा आनंद घेण्यासाठी याच परिसरात राहणारा रणजीत नरसिंगे हा २३ वर्षीय युवक या ठिकाणी आलेला होता आणि हा सर्व आनंद घेत असतानाच अचानक त्याला विजेचा आवाज सहन न झाल्याने त्याच्या नाकातून रक्त येऊ लागले.


ही घटना आजूबाजूला असलेल्या नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी धावपळ करून त्याला बाजूला नेले आणि काही नागरिकांनी डीजे पण केला. त्याला याबाबत उपचार करण्यासाठी घेऊन जात असतानाच रणजीत नरसिंगे याचा मृत्यू झाला त्यामुळे या परिसरात सुरू असलेल्या आंबेडकर जयंतीच्या उत्सवावर ती शोककळा पसरली आहे पोलिसांनी अकस्मात मृत्यूचा नोंद करून तपास सुरू केला आहे.

Comments
Add Comment

कामगार कर्मचारी संघाची नवी मुंबई विमानतळ व्यवस्थापन समितीची कार्यकारिणी जाहीर

नवी मुंबई : अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापन समितीच्या

Gayatri Datar : प्रसिद्ध अभिनेत्री लवकरच अडकणार विवाह बंधनात, सोशल मीडियावर शेअर केला 'हा' सुंदर व्हिडीओ

मुंबई : कलाविश्वातील अनेक कलाकार सध्या विवाहबंधनात अडकले आहेत. अशातच आता आणखी एका अभिनेत्रीचा विवाह सोहळा लवकरच

Bigg Boss Marathi 6 : टिकीट टू फिनालेसाठी 'या' सदस्यांमध्ये हाणामारी, बिग बॉसही संतापले

मुंबई : बिग बॉस मराठी ६ सिझन वादग्रस्त ठरल्यामुळे सर्वत्र या सिझनची जोरदार चर्चा रंगली. या बिग बॉस मराठीमधील

Arpit Bala : कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकावर थुंकला प्रसिध्द गायक, रागात बाटलीही फेकली, नेमकं काय घडलं?

मुंबई : आपल्या 'बरगद' या गाण्यामुळे २०२५ मध्ये रातोरात प्रसिद्ध झालेला गायक अर्पित बाला याची सध्या सर्वत्र जोरदार

Akshaye Khanna : 'रहमान डकैत' ते 'थेट शुक्राचार्य', अक्षय खन्नाच्या लूकची सोशल मीडियावर चर्चा

मुंबई : धुरंधर २ सिनेमानं जगभरात धूमाकूळ घातली आहे. धुरंधर २ सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून सर्वत्र रणवीर सिंह आणि

Rahul banerjee : शुटिंगदरम्यान अभिनेत्याच्या दुर्देवी मृत्यू, चाहत्यांना बसला मोठा धक्का

मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्यासोबत धक्कादायक घटना घडली असून शुटिंगदरम्यान झालेल्या अपघातात या अभिनेत्याचा