हा फक्त राष्ट्रपतींचा नव्हे, तर संविधानाचा अपमान, पंतप्रधान मोदींचा ममता सरकारवर घणाघात

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यक्रमात प्रोटोकॉलचे उल्लंघन झाल्याच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारवर जोरदार टीका केली. ही घटना केवळ राष्ट्रपतींचा अपमान नसून, भारताच्या संविधान आणि लोकशाहीच्या भावनेवर आघात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त रविवारी दिल्लीमध्ये आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदी सुमारे ३३ हजार ५०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करत होते. यावेळी आयोजित जनसभेला संबोधित करताना त्यांनी पश्चिम बंगाल सरकारवर निशाणा साधला. पंतप्रधान मोदी म्हणाले, आज देश आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करत आहे, पण काल पश्चिम बंगालमध्ये ममता सरकारने देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा घोर अपमान केला. त्या संथाल समाजाच्या मोठ्या उत्सवात सहभागी होण्यासाठी बंगालमध्ये गेल्या होत्या. मात्र त्यांचा सन्मान करण्याऐवजी तृणमुल काँग्रेसने या पवित्र कार्यक्रमाचा बहिष्कार केला.

मोदी पुढे म्हणाले की, द्रौपदी मुर्मू स्वतः आदिवासी समाजातून आलेल्या आहेत आणि त्या नेहमीच आदिवासी समाजाच्या विकासासाठी प्रयत्नशील असतात. तरीही राज्य सरकारने या कार्यक्रमाचे व्यवस्थापन योग्य प्रकारे केले नाही. हे केवळ राष्ट्रपतींचा अपमान नाही, तर भारताच्या संविधानाचा आणि लोकशाहीच्या महान परंपरेचाही अपमान आहे. सत्तेचा अहंकार कोणाचाही टिकत नाही. तो बंगालची जनता लवकरच चकनाचूर करेल, असे ते म्हणाले.

केंद्राने बंगाल सरकारकडून मागवला अहवाल

राष्ट्रपती मुर्मू या उत्तर बंगाल दौऱ्यावर असताना दार्जिलिंग जिल्ह्यातील ९व्या आंतरराष्ट्रीय संथाल परिषदेत मुख्य अतिथी म्हणून सहभागी झाल्या होत्या. सुरुवातीला हा कार्यक्रम फांसीदेवा ब्लॉकमधील बिधाननगर येथे होणार होता, जिथे मोठ्या प्रमाणावर संथाल आदिवासी समाजातील लोक उपस्थित राहू शकले असते. मात्र राज्य प्रशासनाने सुरक्षा, गर्दी आणि इतर कारणे सांगत कार्यक्रमाचे ठिकाण बागडोगरा विमानतळाजवळील गोसाईंपूर येथे हलवले. राष्ट्रपतींनी या बदलाबाबत नाराजी व्यक्त करत नवीन ठिकाण लहान असल्याने अनेकांना कार्यक्रमात सहभागी होता आले नसल्याचे सांगितले. तसेच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी किंवा राज्यातील कोणताही मंत्री त्यांना स्वागतासाठी उपस्थित नसल्याबद्दलही प्रश्न उपस्थित झाले. दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपचे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी सांगितले की, संबंधित कार्यक्रमाबाबत राज्य सरकारला कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नव्हती.
Comments
Add Comment

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

IST Mandatory 2027 : मार्च २०२७ पासून देशभरात इंडियन स्टँडर्ड टाइम बंधनकारक

नवी दिल्ली : देशातील सर्व संस्था, कंपन्या आणि संबंधित आस्थापनांना मार्च २०२७पासून कायदेशीर, व्यावसायिक, डिजिटल

Manjit Kaur : लिव्ह-इन पार्टनरच्या अत्याचारानंतर ५४ दिवस मृत्यूशी झुंज; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौरचा मृत्यू

मनजीत कौरचा लिव्ह-इन पार्टनर आणि त्याच्या एका साथीदाराच्या क्रूरतेनंतर ५४ दिवस रुग्णालयात जिद्दीने जगण्यासाठी