कधी आहे पापमोचनी एकादशी ? काय आहे या दिवसाचे महत्त्व ? कशी करावी या दिवशी पूजा ?

मुंबई : हिंदू पंचांगाप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षातील अकरावी तिथी म्हणजे एकादशी. हा दिवस भगवान विष्णूच्या उपासनेसाठी, आध्यात्मिक शुद्धीसाठी आणि शारीरिक-मानसिक नियंत्रणासाठी उपवास करण्याकरिता अतिशय पवित्र दिवस म्हणून ओळखला जातो. दरवर्षी २४ वेळा एकादशी येते. विष्णूला प्रसन्न करण्यासाठी एकादशीला उपवास आणि विष्णूचे नामस्मरण करतात. महाराष्ट्रात आषाढी एकादशी (देवशयनी) आणि कार्तिकी एकादशी (प्रबोधिनी) या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. या दिवशी पंढरपूरची वारी केली जाते. इतर एकादशींना उपवास आणि विष्णूचे नामस्मरण करतात. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी एकादशी ही 'पापमोचनी एकादशी' म्हणून ओळखली. पापातून मुक्तता मिळवण्यासाठी या एकादशीला उपवास आणि विष्णूचे नामस्मरण करतात.


यंदा हिंदू पंचांगाप्रमाणे अर्थात हिंदू कॅलेंडरप्रमाणे रविवार १५ मार्च २०२६ रोजी 'पापमोचनी एकादशी' आहे. 'पापमोचनी एकादशी' शनिवार १४ मार्च २०२६ रोजी सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी सुरू होईल आणि रविवार १५ मार्च २०२६ रोजी सकाळी नऊ वाजून सोळा मिनिटांनी संपेल. उदय तिथीनुसार पापमोचनी एकादशीचे व्रत रविवार १५ मार्च रोजी करायचे आहे. उपवास सोमवार १६ मार्च २०२६ रोजी सकाळी साडेसहा ते आठ वाजून चोपन्न मिनिटे या कालावधीत सोडता येईल.


नकळत घडलेल्या चुका, मानसिक क्लेश आणि पापांच्या भारातून मुक्त होण्यासाठी पापमोचनी एकादशीला उपवास आणि विष्णूचे नामस्मरण करतात. ही एकादशी हिंदू पंचांगानुसार वर्षातली शेवटची एकादशी म्हणून ओळखली जाते. वर्षभरातील नकारात्मकता नष्ट करण्यासाठी पापमोचनी एकादशीचे व्रत म्हत्त्वाचे मानले जाते. ब्रह्मपुराणात या एकादशीचा उल्लेख आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा करतात. यासाठी आंघोळ करुन धूत वस्त्र अथवा सोवळे नेसून संकल्प करतात. शुद्ध तुपाचा दिवा लावून विष्णूची प्रतिमा किंवा मूर्ती याची प्रतिष्ठापना करतात. मूर्तीला पंचामृताने स्नान घालतात. नंतर विष्णूला तुळशीची पानं अर्पण करतात. विष्णूसहस्त्रनामाचा जप करतात. विष्णूच्या कथांचे वाचन करतात. उपवास करतात किंवा ताज्या फळांचे सेवन करतात. विष्णूचे नामस्मरण करतात. या व्रताला मनापासून केले तर आर्थिक, सामाजिक, मानसिक प्रगती होते असे सांगतात. अडचणींमधून मार्ग निघतो असेही सांगतात. यामुळे ज्यांची श्रद्धा आहे अशी मंडळी मनापासून हे व्रत करतात.


ही संकलित माहिती आहे. प्रयोग करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे हिताचे आहे.

Comments
Add Comment

Monsoon Delay : जिल्ह्यात ३० जूनपर्यंत जलतरण तलाव बंद

अलिबाग : जिल्ह्यातील उष्ण व दमट हवामान, मान्सूनच्या आगमनास झालेला विलंब, कमी पर्जन्यमान आणि उपलब्ध जलसाठ्यातील

Samantha Ruth Prabhu : समंथा रुथ प्रभू प्रेग्नंट? व्हायरल व्हिडीओनंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण

दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) पुन्हा एकदा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सोशल

International Yoga Day : अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी यांनी योग दिनी शेअर केले खास सीक्रेट

International Yoga Day :मुंबई : १२व्या आंतरराष्ट्रीय योग (International Yoga Day) दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून (PM Narendra Modi) ते अनेक

Parbhani Temple Collapse : परभणीत भीषण दुर्घटना; मंदिरातील बांधकामाचा भाग कोसळून 7 भाविकांचा मृत्यू

परभणी : महाराष्ट्रातील परभणी (Parbhani) जिल्ह्यातील यशवाडी देवस्थान हनुमान मंदिरात शनिवारी मोठी दुर्घटना घडली. मंदिर

Cocktail 2: 'कॉकटेल 2'ची बॉक्स ऑफिसवर दमदार झेप; दोन दिवसांत इतक्या कोटींचा टप्पा पार

Cocktail 2 : शाहिद कपूर (Shahid Kapoor), रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) आणि कृती सनॉन (Kriti Sanon) यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'कॉकटेल 2' (Cocktail 2)

Pune Crime : किरकोळ वादाचे हिंसक रूपांतर; पुण्यात गुंडाकडून हल्ल्याचा प्रयत्न

Pune Crime : पुणे :  पुण्यातील (Pune) पाटील इस्टेट परिसरात एका किरकोळ वादातून मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. गाडी