छगन भुजबळ नाराज; म्हणाले, मी फक्त आमदार, उपोषण करायला मोकळा!

  91

पुणे : महात्मा फुले वाड्याच्या कामासाठी मला उपोषण करावं लागेल, कारण मी फक्त सरकारमधील घटक पक्षाचा आमदार आहे, असे विधान करत अजित पवार गटाचे आमदार छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आज आपल्या नाराजीचा स्पष्ट सूर लावला. पुण्यात फुलेवाड्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी आलेल्या भुजबळांनी यावेळी मंत्रिमंडळात डावलल्याबाबत अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली.


विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. या मंत्रिमंडळामध्ये छगन भुजबळांना डावलण्यात आल्याने भुजबळ नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले. राज्य मंत्रिमंडळ विस्तारात भुजबळांना स्थान न मिळाल्याने त्यांचं नाराज असणं, यावर अनेक तर्क-वितर्क सुरू होते. मात्र आज त्यांच्या थेट वक्तव्यामुळे ही नाराजी उघड झाली आहे.



महात्मा फुले वाड्याच्या रखडलेल्या कामावर बोलताना भुजबळ म्हणाले, "या ऐतिहासिक वाड्याचे काम १०० ते २०० कोटींचे आहे. अनेक वर्षांपासून प्रयत्न करत असलो तरी काहीही प्रगती झालेली नाही." तसेच, "ही जागा देशाला अर्पण झाली आहे. येथे येणाऱ्या लोकांसाठी सुविधा नाहीत. सभा घेण्यासाठीही जागा नाही. तरीही अधिकाऱ्यांकडून फक्त टोलवाटोलवी होत आहे," असे ताशेरे ओढत त्यांनी आंदोलनाचा इशाराही दिला.


"मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री सकारात्मक असले तरी पालिका अधिकारी जमिनीच्या अधिग्रहणाबाबत निष्क्रिय आहेत. जागा ताब्यात घेण्याचा वेग शून्य आहे," अशी थेट टीकाही त्यांनी केली.


दरम्यान, फुलेवाड्यावर आधारित येणाऱ्या हिंदी चित्रपटावर झालेल्या वादावर बोलताना भुजबळ म्हणाले, चित्रपट निर्मात्यांनी माझी भेट घेतली होती. त्यांनी विविध पुस्तकांच्या आधारे चित्रपट तयार केला असून कोणतीही इतिहासाशी छेडछाड केलेली नाही. आक्षेप असल्यास आम्ही पुरावे सादर करू, असे ते म्हणाले.

Comments
Add Comment

Marathi Cinema Screen Issue: मराठी सिनेमाचे अतिरिक्त शोज मल्टीप्लेक्समध्ये लागणार! शासनाचा सर्वात मोठा निर्णय

मराठी सिनेमा जगविण्यासाठी आणि वाढवण्यासाठी राज्य सरकार सुचवणार उपाययोजना मुंबई: मराठी सिनेमांना

'यात्री ॲप'वर करा एसटीचे बुकींग!

मुंबई : चालकाला सन्मानजनक मोबदला आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणारे राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप

माधुरीला नांदणी मठात परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार

राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार - मुख्यमंत्री मुंबई : नांदणी मठातील (ता. शिरोळ, जि.

मोठी अपडेट : आता दिवाळीनंतर फुटणार फटाके! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख ठरली

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अखेर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य निवडणूक

पुण्यात भीषण अपघात: रक्षाबंधनाच्या आधीच बहीण-भावाची ताटातूट, तरुणाचा जागीच मृत्यू

पुणे : पुण्यामध्ये एका धक्कादायक अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर त्याची बहीण गंभीर जखमी झाली आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात महत्त्वाचे निर्णय मंजूर

मुंबई : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.