राणीबागेची देखभाल करणाऱ्या संस्थेवर मलबार हिलच्या निसर्ग उद्यानाची जबाबदारी
मुंबई, खास प्रतिनिधी : दक्षिण मुंबईत कमला नेहरू उद्यान आणि फिरोजशाहा मेहता उद्यान यांना जोडणारे निसर्ग उद्यान अर्थात एलिव्हेटेड नेचर ट्रेल बनवण्यात आल्यानंतर आता ठिकाणच्या सुरक्षा आणि स्वच्छतेसह इतर प्रकारच्या देखभालीवर राणीबागेचा ‘ऑरा’ दिसून येणार आहे. याठिकाणी पर्यटकांकडून ऑनलाईन बुकींग केले जात असून याचे स्लॉट बूक होत आहेत. त्यामुळे याठिकाणी पर्यटकांची वाढती गर्दी आणि त्यामुळे तेथील सुरक्षा आणि स्वच्छतेचा मुद्दा समोर आल्याने महापालिकेच्यावतीने याच्या देखभालीसाठी खासगी संस्थेची नेमणूक केली आहे. या कामासाठी राणीबागेची देखभाल राखणारी ऑरा एफ एम एस प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनीवर जबाबदारी सोपवली आहे.
मलबारहिलमधील कमला नेहरु उद्यान आणि आणि फिरोझशहा मेहता उद्यान अर्थात हँगिंग गार्डन हे महापालिकेच्या जलअभियंता विभागाच्या अखत्यारित येत असून या उद्यानांमध्ये आता महापालिकेच्यावतीने निसर्ग उद्यान अर्थात एलिव्हेटेड नेचर ट्रेल बनवण्यात आले आहे. या निसर्ग उद्यानांमध्ये सुट्टीच्या दिवशी १५०० पर्यटक आणि इतर दिवशी सरासरी १००० पर्यटक भेट देत असतात.
त्यामुळे याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांचे व्यवस्थापन करणे, या वास्तूची स्वच्छता, तेथे उपलब्ध असलेल्या सोयी सुविधा, विद्युत व यांत्रिक बाबी आदींची योग्यप्रकारे देखभाल करण्यासाठी पुरेसा कामगार वर्ग नसल्याने या कामासाठी दोन वर्षांकरता खासगी संस्थेची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मागवलेल्या निविदेमध्ये हाय वे कंन्स्टक्शन कंपनी आणि ऑरा एफ एम एस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने भाग घेतला होता. यामध्ये ऑरा या कंपनीची निवड करण्यात आली आहे. ऑरा ही कंपनी सध्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहायलाच्या देखभाल करत असून याच कंपनीवर आता मलबारहिलमधील निसर्ग उद्यानाच्या देखभालीची जबाबदारी सोपवली आहे. या दोन वर्षांसाठी नेमलेल्या संस्थेला सुमारे दीड कोटींचे कंत्राट मंजूर करण्यात आले आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…
ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…