Thursday, April 17, 2025
Homeब्रेकिंग न्यूजSSC Result : दहावीचा निकाल 'या' तारखेपर्यंत लागणार

SSC Result : दहावीचा निकाल ‘या’ तारखेपर्यंत लागणार

मुंबई : महाराष्ट्र राज्य मंडळाकडून (Mahrashtra State Board) दरवर्षी दहावी (SSC Exam) आणि बारावीच्या परीक्षा (HSC Exam) घेण्यात येतात. यंदाही २१ फेब्रुवारी ते २७ मार्च या कालावधीत दहावी बोर्डाची परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांसह पालकांचे दहावीच्या निकालाकडे लक्ष लागले आहे. त्यासंदर्भात आता महत्त्वाची बातमी समोर आली आहे. (SSC Exam Result)

भाजपाच्या किरीट सोमैयांनी ७२ मशिदींविरोधात नोंदवला FIR

मागील काही वर्षांत एसएससी आणि एचएससी परीक्षांचे निकाल मे महिन्याच्या अखेरीस जाहीर करण्यात आले होते. मात्र, यंदा दहावीचा निकाल १५ मे पूर्वीच जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे यंदा एसएससी परीक्षेचा हा निकाल राज्य मंडळाच्या इतिहासातील सर्वात जलद निकाल असेल, असे म्हटले जात आहे.

१६ लाख ११ हजार ६१० विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

यंदा १६ लाख ११ हजार ६१० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत विद्यार्थीसंख्या दोन हजारांनी वाढली आहे. परीक्षेसाठी २३ हजार ४९२ माध्यमिक शाळांतून नोंदणी केलेल्या १६ लाख ११ हजार ६१० विद्यार्थ्यांमध्ये ८ लाख ६४ हजार १२० मुले, ७ लाख ४७ हजार ४७१ मुली आणि १९ तृतीयपंथी आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -