Friday, May 9, 2025

महाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

PM MODI SPEECH : नागपूरमध्ये मराठीत बोलले पंतप्रधान मोदी, भाषणात काय म्हणाले ?

PM MODI SPEECH : नागपूरमध्ये मराठीत बोलले पंतप्रधान मोदी, भाषणात काय म्हणाले ?
नागपूर : गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना अतिशय मन:पूर्वक शुभेच्छा... आजपासूव नवरात्राचे पवित्र पर्व सुरू होत आहे. देशातील कानाकोपऱ्यात गुढीपाडव्याचा सण साजरा केला जात आहे. नागपूरमध्ये आज माधव नेत्रालयाच्या रुपात एका तीर्थक्षेत्राची स्थापना होत आहे. माधव नेत्रालयामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाला माझ्या शुभेच्छा. देशातील सर्व गरिबातील गरिबाला चांगले उपचार मिळाले पाहिजेत ही प्राथमिकता आहे. देशातील ज्येष्ठ लोकांना त्यांच्या उपचाराची चिंता नसली पाहिजे यासाठी सरकार कटिबद्ध आहे. आयुषमान भारत योजनमुळे लाखो लोकांना मोफत आरोग्य सेवा मिळाली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. त्यांनी मराठी भाषेत गुढी पाडवा आणि नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.



हा दिवस आपल्या प्रेरणास्रोत, परम आदरणीय डॉक्टर साहेबांच्या जयंतीचा देखील आहे. या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गौरवशाली प्रवासाला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. जर आपण आपल्या देशाच्या इतिहासावर नजर टाकली तर शेकडो वर्षांच्या गुलामगिरी आणि आक्रमणांदरम्यान, भारताची सामाजिक रचना नष्ट करण्याचे क्रूर प्रयत्न झाले. पण भारताची जाणीव कधीच संपली नाही, त्याची ज्योत तेवत राहिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एका महान वटवृक्षाप्रमाणे जगासमोर उभा आहे. हा केवळ एक सामान्य वृक्ष नसून, भारताच्या अमर संस्कृतीचा अक्षयवट आहे; असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.



गुलामीच्या अखेरच्या काळात हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींनी संघाच्या स्वयंसेवकांना नवीन ऊर्जा देण्याचं काम केलं. आज आपण पाहतोय, राष्ट्रीय चेतनेच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी जे विचार बीज १०० वर्षापूर्वी पेरलं. ते महान वटवृक्ष बनून जगासमोर आहे. सिद्धांत आणि आदर्शाने या वटवृक्षाला उंची दिली आहे. आम्ही केवळ वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या दुप्पट केली नाही तर एम्स संस्थांची संख्याही वाढवली आहे. अधिकाधिक डॉक्टर उपलब्ध व्हावेत यासाठी वैद्यकीय जागांची संख्याही दुप्पट करण्यात आली आहे. देशातील गरीब मुलांना डॉक्टर बनता यावे यासाठी, आम्ही पहिल्यांदाच मातृभाषेत वैद्यकीय शिक्षण दिले आहे जेणेकरून ते कोणत्याही भाषेच्या अडथळ्याशिवाय त्यांची स्वप्ने पूर्ण करू शकतील; असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
Comments
Add Comment