Saturday, May 10, 2025

महाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

Devendra Fadnavis : 'माधव नेत्रालय महाराष्ट्रासाठीच नाही तर...'; काय म्हणाले फडणवीस ?

Devendra Fadnavis : 'माधव नेत्रालय महाराष्ट्रासाठीच नाही तर...'; काय म्हणाले फडणवीस ?
नागपूर : पंतप्रधान मोदींनी नागपूर दौऱ्यात रेशीमबागेतील स्मृती मंदिर, दीक्षाभूमी या ठिकाणांना भेट दिली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सरसंघचालक डॉ. हेडगेवार तसेच सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांना अभिवादन केले. यानंतर पंतप्रधान मोदींनी नागपूरमध्ये माधव नेत्रालयाच्या विस्तारीत इमारतीचे भूमिपजून केले. याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मोहन भागवत उपस्थित होते.



माधव नेत्रालयाच्या विस्तारीत इमारतीच्या भूमिपजूनावेळी केलेल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे वक्तव्य केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सर्वांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे की, आज माधव नेत्रालयाचे भूमिपूजन होत आहे. मागील काही वर्षांपासून माधव नेत्रपेढी काम करत आहे. अनेक लोकांच्या जीवनात प्रकाश आणण्याचे काम माधव नेत्रपेढीने केले आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की, दृष्टी ही देवाने दिलेली सर्वात मोठी गोष्ट आहे. ज्यांना दृष्टी नाही त्यांना दृष्टी देणे, यापेक्षा कोणतीही मोठी सेवा नाहीये. आमच्या स्वयंसेवकांनी गेल्या ३० वर्षात निरंतर ही सेवा सुरू ठेवलेली आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, देशामध्ये मोठ्या प्रमाणात नेत्रसेवाची आवश्यकता आहे. विशेष: आता मोठ्या प्रमाणात नेत्रदान होत आहे. लोक फक्त संकल्प घेत नाही तर नेत्रदान देखील करत आहेत. यामुळे हे अत्यंत महत्वाचे आहे.माधव नेत्रालय केवळ नागपूर आणि महाराष्ट्रासाठी नाही तर पूर्ण मध्य भारतासाठी एक महत्वपूर्ण संस्था होणार आहे. यामुळे अनेक लोकांना दृष्टीदोषपासून मुक्ती मिळेल आणि अनेकांना दृष्टी मिळेल. काही लोकांना देवाने दिलेला हा जो आशीर्वाद आहे तो मिळेल. मी माधव नेत्रालयाच्या सर्व संचालकांना खूप शुभेच्छा देतो. कारण देवाचे काम त्यांनी हातात घेतले आहे.
Comments
Add Comment