Thursday, April 17, 2025
Homeमहाराष्ट्रपंच नद्यांचे वरदान, तरीही वाडा तालुका तहानलेला

पंच नद्यांचे वरदान, तरीही वाडा तालुका तहानलेला

वाडा : तालुक्यात दोनशे खेडी व दोनशेहून अधिक पाडे असून ८६ ग्रामपंचायती आहेत. तालुक्याची लोकसंख्या दहा लाखांच्या आसपास आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात पाणी समस्येचे निराकरण होत नसल्याने तालुक्यात उज्जैनी, आखाडा, भगत पाडा, वडवली, विरे, सातरोंडे, साखरशेत, घायपात पाडा, भोकरपाडा, वंगण पाडा, नांदणी, अंबरभुई, गाय गोठा, कोशिमशेत या गावपाड्यांमध्ये पाणी समस्येने उग्ररूप धारण केले आहे.

तालुक्याला बारमाही मुबलक पाणी असणाऱ्या वैतरणा, तानसा, पिंजाळ, गार गाई व देहर्जे या पाच नद्यांचे वरदान लाभले आहे. मात्र लोकप्रतिनिधी,अधिकाऱ्यांनी मनावर घेतल्यास वैतरणा नदीचे जे पाणी कोकाकोला कंपनीला नेता येते, ते पाणी पुरेसा निधी उपलब्ध केला, तर जनतेला का मिळू शकणार नाही, असा सवाल नागरिक करीत आहेत.

तालुक्यातील दुर्गम भाग मानला जाणाऱ्या सागमाल, तिरमाल, मुह माळ, घोड सागरे, फणस पाडा या गाव पाड्यातील महिलांना भर उन्हात हंडा घेऊन पायपीट करावी लागते. वास्तविक आदिवासींना पाणी वेळेत आणि मुबलक मिळावे, यासाठी जलजीवन मिशन सारख्या योजना कोट्यावधी रुपये ओतून राबवल्या जात आहेत. मात्र त्यांचे निकृष्ट दर्जाचे काम, त्यात ठेकेदार व अधिकाऱ्यांनी मलिदा खाऊन अर्धवट केलेली कामे, यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यातच दुर्गम भागात रस्ते अभावी टँकरने पाणीपुरवठा करणे अवघड आहे.

नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकरच खात्यात जमा होणार

या नद्यांवर धरण किंवा बंधारा बांधण्याची गरज आहे. या बंधाऱ्यातून वाड्यासह विक्रमगड तालुक्याला देखील पाणीपुरवठा होईल. यासाठी नद्यांमधून जाणारे पाणी अडवण्याची गरज आहे. तालुक्यातील अनेक गाव-पाडे पाणी टंचाईला तोंड देत असून अधिकारी तालुक्यात पाणीटंचाई नाही,अशा खोट्या फुशारक्या मारत आहेत. तालुक्यातील अनेक गावपाड्यातील महिलांना आत्तापासूनच पाण्यासाठी रात्री जागरण करावे लागते. तर काही गावात हंडाभर पाण्यासाठी आळीपाळीने पाणी भरावे लागते.

या नद्यांवर एक तरी मोठा बंधारा बांधण्यात आला, तर तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटून शेतीला देखील पाणी मिळेल मात्र लोकप्रतिनिधी उत्सुक नसल्याने पाच नद्यांचे वरदान लाभूनही वाडा तालुका तहानलेलाच आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -