मुंबई : नवीन महिन्याला सुरुवात होताच आरबीआयकडून (RBI) बँकींग सुट्ट्यांची यादी जाहीर केली जाते. त्यानुसार ३१ मार्च रोजी रमजान ईद निमित्त (Eid Holiday) ...
मुंबई पोलिसांनी कुणाल कामरा प्रकरणी शिवसेना आमदार मुरजी पटेल यांच्या तक्रारीआधारे झिरो एफआयआर नोंदवून घेतली आहे. नंतर एफआयआर तपासाकरिता खार पोलीस ठाण्याकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. एफआयआर भारत न्याय संहिता कलम ३५३ (१) (ब), ३५३ (२) (सार्वजनिक उपद्रव) आणि ३५६ (२) अंतर्गत नोंदवण्यात आली आहे. या प्रकरणात अटकेचे संकट लक्षात येताच स्टँडअप कॉमेडिअन कुणाल कामराने चेन्नई उच्च न्यायालयात याचिका केली आहे. तामीळनाडूतील विलुप्पुरमचा रहिवासी असल्याचे कारण देत कामराने चेन्नई उच्च न्यायालयात जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केला.
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजी नगरच्या सिल्लोड येथे धक्कादायक घटना घडली आहे. ४ मुलानंतर मुलगी नाही म्हणून दत्तक घेतलेल्या ४ वर्षीय मुलीला सावत्र ...
याआधी मुंबई पोलिसांनी कामराला मंगळवार २५ मार्च पर्यंत पोलीस ठाण्यात हजर होण्यासाठी नोटीस बजावली होती. पण कामराने वेळ मागितला. यानंतर पोलिसांनी कामराला सोमवार ३१ मार्चपर्यंत हजर होण्यासाठी दुसरी नोटीस बजावली. तर कुणाल कामराने अटक टाळण्यासाठी चेन्नई उच्च न्यायालयात धाव घेतली.