महापुरुषांची नावे संक्षिप्त घेणाऱ्यांवर कारवाई करा; शिवसेना नगरसेवकांची मागणी

मुंबई: मुंबई महापालिकेच्या वतीने जोगेश्वरी रुग्णालयाचे नामकरण हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालय करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात या नावाचा उल्लेख न करता संक्षिप्त नामोल्लेख केला जात आहेत. हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे रुग्णालय याचे संक्षिप्त नामोल्लेख एच बी टी ट्रॉमा रुग्णालय असा करण्यात आल्याने शिवसेना नगरसेवकांनी यावर आक्षेप नोंदवले आहे. महापालिका सभागृहात हरकतीचा मुद्द्याद्वारे या या बाबीकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेताना असा नामोल्लेख करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नगरसेवकांनी केली आहे.


मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात शिवसेना गटनेते अमेय घोले यांनी रुग्णालया संदर्भात जाहीर करण्यात आलेल्या निविदा जाहिरातीवर प्रशासनाचे लक्ष हरकतीच्या मुद्द्याद्वारे वेधून घेतले. या जाहिरातीत एच बी टी ट्रॉमा रुग्णालय असा उल्लेख केला असून असे महापालिकेचे रुग्णालय कुठे आहे याबाबत गुगलवर सर्च केले. आणि सर्व ठिकाणी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण असे कुठलेही महापालिकेचे रुग्णालय असल्याचे दिसून आले नाही.


जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर रुग्णालयाचे नामकरण हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालय असे केलेले आहे. शिवसेनेचे नाव या रुग्णालयाला गौरवा प्रीत्यर्थ देण्यात आहे. ते एक महापुरुष असून त्यांचे नाव आदराने घेतले पाहिजे. त्याचे नाव जर अशाप्रकारे संक्षिप्तपणे घेतले जात असेल तर आम्ही ते खपवून घेणार नाही. त्यामुळे महापुरुषाचे नाव अशा प्रकारे संक्षिप्त लिहून जाहिरात प्रदर्शित करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी घोले यांनी केली. तसेच भविष्यात जर असे प्रकार घडले तर वेगळी किंमत मोजावी लागेल असा इशारा त्यांनी दिला. त्यामुळे याबाबत योग्य ते कार्यवाही प्रशासनाने करावी अशी मागणी त्यांनी केली.


याला शिवसेनेच्या नगरसेविका आणि स्थापत्य समिती अध्यक्षा यामिनी जाधव यांनी पाठिंबा दिला आणि त्यांनी कोणत्याही महापुरुषाला एक उपाधी दिली जाते, ती उपाधी सन्मानाने घेतली पाहिजे भायखळा वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहायाचा उल्लेख राणी व्हिक्टोरिया असा केला होता याबाबत नाराजी व्यक्त केली. यावर महापौर रितू तावडे यांनी प्रशासनाला निर्देश देत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना करत हरकतीचा मुद्दा राखून ठेवला.

Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी

Prakash Abitkar : गावापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत ‘मानकांनुसार आरोग्यसेवा’

मुंबई : राज्यातील नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी

Rain In Maharashtra : महाराष्ट्रात पाऊस पुन्हा फॉर्मात येणार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरात बरसणार ?

मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्राकडे मोर्चा वळवल्याचे चित्र आहे.

Ashish Shelar : गणेशमूर्ती आगमन मार्गांची २४ तासांत पाहणी; प्रशासकीय कसूर आढळल्यास कारवाई - आशिष शेलार

मुंबई : भुलेश्वरचा राजा गणेश मंडळाच्या गणेशमूर्ती आगमन सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील

Weather Update : महाराष्ट्रात सोमवारी कोण कोणत्या भागात पावसाची शक्यता ?

मुंबई : हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवार २४ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.

Indian Railway : भारतीय रेल्वेचा नवा विक्रम; पहिल्या डबल-स्टॅक लाँग-हॉल कंटेनर ट्रेनची यशस्वी धाव

मुंबई : भारतीय रेल्वेने मालवाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट (JNPT) येथून