Bank Holiday : बँकेची ईदची सुट्टी रद्द; ३१ नव्हे 'या' तारखेला राहणार बँका बंद!

मुंबई : नवीन महिन्याला सुरुवात होताच आरबीआयकडून (RBI) बँकींग सुट्ट्यांची यादी जाहीर केली जाते. त्यानुसार ३१ मार्च रोजी रमजान ईद निमित्त (Eid Holiday) महाराष्ट्रात आणि भारतातील बहुतांश राज्यात सुट्टी देण्यात आली होती मात्र आता आरबीआयने नवीन निर्देश जारी करत त्या दिवशी सुट्टी (Bank Holiday) रद्द केली आहे. त्यामुळे आता रमजानच्या दिवशी सर्व बँकिंग सेवा सुरु राहणार आहेत. जाणून घ्या यामागचं नेमकं कारण काय.



येत्या १ एप्रिल २०२५ पासून नवं आर्थिक वर्षाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक व्यवसाय संस्थेत बदल होत राहतात. आरबीआयकडून (RBI) देखील नवं वर्षात देशभरातील सर्व बँकिगच्या नियमावलीत बदल केले जातात. दरम्यान, ३१ मार्च आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्यामुळे आरबीआयने हा निर्णय घेतला आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षांशी निगडीत सर्व आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी बँकेच्या कर्मचाऱ्यांना कामावर यावे लागणार आहे. दरम्यान, आज आणि उद्या जम्मू काश्मीरमधील बँका बंद राहणार आहेत. २९ मार्च शनिवारी बँका बंद असतील अस अनेकांना वाटत आहे. मात्र, २९ तारखेला पाचवा शनिवार असल्याने बँका खुल्या राहणार आहेत.


त्याचबरोबर. रिझर्व्ह बँकेने (RBI) सुरूवातीच्या काळात ३१ मार्चला बँक हॉलिडे जाहिर केला होता, परंतु २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने आणि वर्षातील आर्थिक व्यवहार पूर्ण करण्याची अंतिम तारीख असल्याने ही सुट्टी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे ही सुट्टी १ एप्रिल रोजी बँकांना सुट्टी देण्यात येणार आहे.



बँक सुट्ट्यांच्या दिवशी कोणत्या बँकिंग सेवा राहणार सुरु?


बँक सुट्ट्यांच्या (Bank Holiday) दिवशी ग्राहक वर्षभरासाठी डिजिटल किंवा नेट बँकिंग सेवा वापरू शकतात. तसेच सर्व बँक वेबसाइट्स, बँकिंग अ‍ॅप्स, UPI आणि ATM सेवा वर्षभर सक्रिय राहतील. या दिवशी तुम्ही डिजिटल पद्धतीने फिक्स्ड डिपॉझिट किंवा रिकरिंग डिपॉझिट देखील सुरू करू शकता.

Comments
Add Comment

ONGC Russia Venezuela oil wells : कच्च्या तेलाच्या बाजारात भारताची मोठी झेप! व्हेनेझुएला अन् रशियातील तेल विहिरींवर आता ONGC चे वर्चस्व

नवी दिल्ली : जागतिक इंधन बाजारात आणि ऊर्जा क्षेत्रात भारताचा प्रभाव अधिक मजबूत करणारी एक अत्यंत महत्त्वाची

Resident Doctors Strike High Court Verdict : "काम नसेल तर पगार..."; संपावर जाणाऱ्या निवासी डॉक्टरांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दणका!

मुंबई : होमियोपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत (MMC) सशर्त नोंदणी देण्याच्या राज्य सरकारच्या

Phuket delhi air india flight Turbulence : हवेत अचानक लागला भीषण झटका अन् प्रवासी थेट छतावर आदळले! एअर इंडियाच्या विमानात ताणतणाव आणि किंचाळ्या; १७ जण जखमी

नवी दिल्ली : विमानातून प्रवास करताना "सीटबेल्ट बांधा" अशी सूचना मिळणे ही अगदी सामान्य गोष्ट आहे. मात्र, मंगळवारी

Tarun Tejpal : मोठी बातमी! 'तहलका'चे संस्थापक तरुण तेजपाल यांना १० वर्षांचा तुरुंगवास

२०१३ च्या लैंगिक अत्याचार प्रकरणात उच्च न्यायालयाचा मोठा निकाल! पणजी : प्रसिद्ध 'तहलका' मासिकाचे संस्थापक तरुण

Uttar Pradesh News : उत्तर प्रदेशात 100 वर्षे जुने घर कोसळले; एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यात मध्यरात्री घडलेल्या भीषण दुर्घटनेत 100 वर्षे जुने घर कोसळून

Devendra Fadnavis Gen Z : तरुणांची नाराजी दूर करण्यासाठी फडणवीस सरकारचा 'मास्टरप्लॅन'; 'जेन Z' साठी ९ मोठे निर्णय ठरणार गेमचेंजर!

मुंबई : राज्यातील तरुण पिढी, विशेषतः 'जेन Z' (Gen Z) म्हणजेच नव्या युगातील युवक-युवतींमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता