

अवघ्या तीन वर्षात दुसऱ्यांदा पक्षांतर करणार, स्नेहल जगताप राष्ट्रवादीत प्रवेश करणार
मुंबई : अवघ्या तीन वर्षात स्नेहल जगताप दुसऱ्यांदा पक्षांतर करणार आहेत. राज्यात तीन वर्षांपूर्वी राजकीय भूकंप झाला. त्यावेळी काँग्रेसमधून उद्धव ...
विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी न्यायालयात सुनावणीवेळी गुन्ह्याशी संबधित सर्व घटनाक्रम सांगितला. जगमित्र कार्यालयात वाल्मिक कराडने खंडणी मागितल्याचे त्यांनी सांगितले. संतोष देशमुखांना कायमचा धडा शिकवा असे विष्णू चाटे म्हणाल्याचेही त्यांनी न्यालायाला सांगितले. नोव्हेंबर २०२४ च्या २९ तारखेला विष्णू चाटेच्या कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत सगळे आरोपी हजर होते, असे निकम म्हणाले. यानंतर ८ डिसेंबर रोजी नांदूर फाटा येथील हॉटेल तिरंगावर विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांची बैठक झाली. संतोष देशमुख खंडणी प्रकरणात आडवे येत आहेत अशी चर्चा या बैठकीत झाली. यावर 'त्याला कायमचा धडा शिकवा', असे विष्णू चाटे म्हणाल्याचे उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे विधानसभेचे नवे उपाध्यक्ष
मुंबई : अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी एकमताने निवड झाली. विधानसभा ...
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी हे प्रकरण आरोप निश्चितीसाठीसाठी तयार असल्याचे न्यायालयाला सांगितले. मात्र, आरोपींच्या वकिलांनी त्यांना कागदपत्रे न मिळाल्यामुळे आरोप निश्चिती करु नका अशी विनंती न्यायालयाला केली. या युक्तिवादानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या खटल्याची पुढील सुनावणी १० एप्रिल रोजी असेल; असे न्यायालयाने सांगितले. यामुळे आरोप निश्चितीची प्रक्रिया १० एप्रिल रोजी होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे.