मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या कंत्राटी उपायुक्त (पायाभूत सुविधा) पदी असलेल्या उल्हास महाले यांचा कार्यभार १४ मार्च रोजी संपुष्टात आल्यानंतर या रिक्त जागेचा आता अतिरिक्त कार्यभार उपायुक्त (अभियांत्रिकी) शशांक भोरे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. या पदासाठी कायम उपायुक्ताची नेमणूक करणे आवश्यक असताना तसेच या पदासाठी जलअभियंता पुरुषोत्तम माळवदे यांना उपायुक्त पदी बढती देवून त्यांची यापदी नियुक्ती करण्यासाठी आयुक्तांकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवूनही त्त्याला मंजुरी मिळत नाही. उलट याला मंजुरी न देता उपायुक्त (पायाभूत सुविधा प्रकल्प) पदाचा अतिरिक्त कार्यभार भोळे यांच्याकडे सोपवल्यामुळे महाले यांना पुन्हा एकदा येण्याची संधी दिली जाणार आहे का की कुणा तरी अधिकाऱ्याची वर्णी लावण्यासाठी या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मागील काही महिन्यांपूर्वी महापालिकेने आवश्यकता नसतानाही उल्हास महाले यांना सेवा निवृत्तीनंतर पुन्हा त्यांच्या त्याच उपायुक्त (पायाभूत सुविधा) या पदावर कंत्राटी तत्वावर सामावून घेतले. या कंत्राटी उपायुक्त पदाची नियुक्ती केवळ एक वर्षांकरता होता आणि याचा कालावधी १४ मार्च २०२५ रोजी संपुष्टात आला. त्यामुळे १२ मार्च २०२५ रोजी उल्हास महाले यांनी पदभार सोडला. त्यानंतर १७मार्च रोजी उपायुक्त शशांक भोरे यांच्याकडे सोपवण्यात अला आहे.
परंतु एक वर्ष सेवा निवृत्त झालेल्या महाले यांना कंत्राटी तत्वावर उपायुक्तपदी नेमल्यामुळे मागील वर्षभरात अनेक प्रमुख अभियंता पदावरून बढती मिळालेल्या उपायुक्तांना या पदाचा लाभमिळू शकला नाही. परंतु आता महाले यांचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर यापदावर कायम उपायुक्ताची निवड होणे आवश्यक असतानाही प्रशासनाकडून पुन्हा कुणा अधिकाऱ्याला कंत्राटी पध्दतीवर येण्याच्या मार्ग खुला ठेवला आहे. तसेच कोणा एका अधिकाऱ्याला लाभ मिळावा यासाठी या पदावर अतिरिक्त पदाचा भार सोपवला आहे. मागील काही दिवसांपूर्वी जलअभियंता माळवदे यांचा प्रस्ताव तयार करून आयुक्तांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला असून महाले यांच्यामुळे रिक्त होणाऱ्या जागेवर उपायुक्तपदी बढती देवून माळवदे यांची वर्णी लावण्यासाठी प्रस्ताव तयार केला होता.
नवी दिल्ली : देशातील सर्वात स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या UPSC CSE मध्ये दरवर्षी…
मुंबई : 'मुंबईतील लँड स्कॅमचा बादशाह जर कोणी असेल, तर तो उद्धव ठाकरेच!' अशा शब्दांत…
कोविड महामारी दरम्यान संसर्ग झालेल्या लोकांना हृदयरोगांचा धोका सर्वाधिक मुंबई: गेल्या वर्षातील आकडेवारी पाहिल्यास असे…
पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचं क्षेत्र वाढतं चाललं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या…
मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…