Wednesday, April 23, 2025
Homeमहाराष्ट्रकोकणपनवेल बसस्थानकाचे काम लवकर सुरू करणार

पनवेल बसस्थानकाचे काम लवकर सुरू करणार

मुंबई : पनवेल हे मुंबईच्या वेशीवरील वेगाने विकसित होणारे महानगर असून येथे वाढत्या प्रवासी संख्येच्या पार्श्वभूमीवर भव्य बसपोर्ट उभारणे अत्यावश्यक आहे.त्यामूळे २०१८ पासून रखडलेल्या पनवेल बसपोर्ट प्रकल्पाच्या कामाला तात्काळ गती द्या आणि फेरनिविदा प्रसिद्ध करा, अशा स्पष्ट सूचनावजा निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बुधवारी येथे दिल्या.

आज विधानभवनात परिवहन मंत्री सरनाईक यांनी राज्य परिवहन विभागाच्या विविध विषयांवर एक बैठक आयोजित केली होती.यावेळी आमदार विक्रांत पाटील,आमदार बालाजी कल्याणकर,आमदार विजय देशमुख,आमदार दौलत दरोडा, एसटी महामंडळाचे बांधकाम महाव्यवस्थापक दिनेश महाजन, मुख्य लेखाधिकारी गिरीश देशमुख उपस्थित होते.

स्थानिक आमदार विक्रांत पाटील यांनी पनवेल बसस्थानकाच्या रखडलेल्या कामाबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावर मंत्री सरनाईक यांनी हे काम तात्काळ सुरू करण्याचे निर्देश दिले.तसेच नांदेड येथील सांगवी येथे नव्या बसस्थानकाच्या कामालाही गती देण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्या.यासंदर्भात आमदार बालाजी कल्याणकर यांनी देखील पाठपुरावा केला. दरम्यान, शहापूर येथील नवीन बस पोर्ट,सोलापूरच्या मध्यवर्ती बसस्थानकाचे काम देखील वेगाने पूर्ण करावे आणि पावसाळ्यात प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून तात्पुरत्या शेड्स उभारण्याचे आदेशही मंत्री सरनाईक यांनी दिले.वाढते शहरीकरण, शालेय विद्यार्थी आणि नागरिकांच्या सोयीसाठी बस पोर्ट उभारणीला प्राधान्य द्या, अशी मागणी आमदार दौलत दरोडा आणि विजय देशमुख यांनी यावेळी केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -