पुणे : पुण्यातील हिंजवडी परिसरामध्ये बसला आग लागल्याने चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. सहा जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. टेम्पो जळून खाक झाला आहे, तर टेम्पो ट्रॅव्हलमध्ये चौघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. चौघे ही कंपनीचे कर्मचारी होते. व्योमा ग्राफिक्स कंपनीचे एकूण १२ कर्मचारी या टेम्पोमध्ये प्रवास करत होते. त्यावेळी हिंजवडी फेज वनमध्ये चालकाच्या पायाखाली अचानक आग लागली. त्यावेळी चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीनं खाली उतरले. मात्र, मागचा दरवाजा न उघडल्यानं चौघांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. काही जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही बस तमन्ना सर्कल वरून रेजवानच्या दिशेने जात होती. अचानक बसला समोरून आग लागल्याने चालकाने उडी घेतली. ही घटना सकाळी आठच्या सुमारास घडली आहे. बस मध्ये एकूण १५ जण होते.
Purandar Airport : पुरंदर विमानतळाच्या जमिनीसाठी लवकरच मोजणी आणि सर्वेक्षण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तमन्ना सर्कल वरून रिजवान च्या दिशेने जाणाऱ्या बस ने समोरून अचानक पेट घेतला. चालकाला देखील आगीच्या झळा पोहोचल्याने आणि त्याच्या पायाला आग लागल्याने त्याने उडी घेतली. धावत्या बसचा वेग कमी झाला. पुढे काही अंतरावर जाऊन ती सिमेंटच्या ब्लॉकला धडकली. तोपर्यंत बसमधील इतर व्यक्तींनी खिडक्यांमधून उड्या मारल्या परंतु, पाठीमागे असलेल्या चार जणांना बाहेर पडता आलं नाही. आपत्कालीन दरवाजा उघडला गेला नाही. यात चारही जणांचा होरपळून जागीच मृत्यू झाला आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सहा जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.