युवा सेनेचे जिल्हा सरचिटणिस निखिल मांडवे यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
नवी मुंबई : महापालिका शाळेतील मुलींना इयत्ता पहिलीपासूनच ‘गुड टच व बॅड टच’चे शिक्षण देणेबाबत तसेच मुलींना सेल्फ डिफेन्सचे मोफत प्रशिक्षण देण्याची मागणी नवी मुंबई जिल्हा युवा सेना सरचिटणिस निखिल मांडवे यांनी महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्याकडे केली आहे.
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सांगितले की, मीरा रोड येथे झालेला संशयित ‘लोन वुल्फ’ दहशतवादी हल्ला हा स्वतःहून कट्टरपंथी ...
नाशिक : नाशिककरांना तूर्तास दिलासा मिळाला आहे कारण शहरातील सर्वच भागातील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाने दि.१९ जून २०२६ पर्यंत स्थगिती कायम ठेवली ...
विद्यार्थिनींना समजेल अशा सोप्या भाषेत मार्गदर्शन व प्रात्यक्षिके देण्यात यावीत.
शिक्षकांनाही या विषयाचे प्रशिक्षण देण्यात यावे, जेणेकरून ते विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करू शकतील. पालकांसाठीही जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. शाळांमध्ये तक्रार नोंदविण्यासाठी सुरक्षित व गोपनीय यंत्रणा उभी करण्यात यावी. वरिल उपाययोजना महापालिका प्रशासनाने करुन दिल्यास त्यांना शालेय वयात अत्याचाराच्या संभाव्य घटनांपासून बचाव करता येईल व आत्मविश्वासाने शिक्षण घेता येईल. याशिवाय मुलींना स्वत:चे रक्षण करता यावे यासाठी त्यांना सेल्फ डिफेन्सचेही शिक्षण देण्यात यावे, ज्यायोगे त्या योग्य प्रतिकार करुन नराधमांना धडा शिकवतील व स्वत:चे रक्षणही करतील. समस्येचे गांभीर्य व मुलींच्या हितासाठी आपण लवकरात लवकरात या शिक्षण मार्गदर्शनाबाबत संबंधितांना मार्गदर्शन करावे. समस्येचे गांभीर्य व मुलींच्या हितासाठी लवकरात लवकरात या शिक्षण मार्गदर्शनाबाबत संबंधितांना निर्देश देण्याची मागणी निखिल मांडवे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.





