Sunday, April 20, 2025
Homeताज्या घडामोडीAirtel : आयपीएल सुरू होण्याआधी एअरटेलने वानखेडे स्टेडियमवर नेटवर्क वाढवले

Airtel : आयपीएल सुरू होण्याआधी एअरटेलने वानखेडे स्टेडियमवर नेटवर्क वाढवले

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल २०२५ स्पर्धा २२ मार्च २०२५ पासून सुरु होणार आहे. स्पर्धेच्या सामन्यांच्या तयारीसाठी भारती एअरटेलने वानखेडे स्टेडियमवर सर्वसमावेशक व्यवस्था केली आहे. या सामन्यांना किमान लाखभर क्रिकेट चाहते स्टेडियमवर येण्याची शक्यता आहे. या क्रिकेटप्रेमींना तसेच आसपासच्या परिसरातील हजारो नागरिकांना विनाअडथळा सलग आणि उत्तम नेटवर्क मिळावे यासाठी भारती एअरटेलने नियोजन केले आहे.

IPL 2025 : सूर्यकुमार यादव चेन्नई विरुद्धच्या सामन्यात मुंबईचे नेतृत्व करणार

एअरटेलने स्टेडियमच्या आसपासच्या भागात आपल्या सध्याच्या सेल साइट्स मधील सात साइट्स वाढवल्या आहेत. ही वाढ केल्याने सामने पहायला येणाऱ्या एअरटेल ग्राहकांना व्हॉईस आणि डेटा कनेक्टिव्हिटीमध्ये लक्षणीय सुधारणा दिसून येणार आहे. नेटवर्कची श्रेणी वाढविण्याचे धोरणात्मक नियोजन करण्यात आले आहे. जेणेकरून मोठ्या संख्येने येण्याची अपेक्षा केल्या जाणाऱ्या प्रेक्षकांना सामावून घेता येईल.

आयपीएलपूर्वीच गुजरात टायटन्स चॅम्पियन टीमचे मालकच बदलले

तयारीवर बोलताना, आदित्य कुमार कंकारिया, सीईओ, मुंबई भारती एअरटेल म्हणाले, “आगामी आय.पी.एल स्पर्धेला मोठ्या प्रमाणात प्रेक्षक येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणून आम्ही वानखेडे स्टेडियममधील मोबाइल नेटवर्कच्या पायाभूत सुविधांची श्रेणी वाढविली आहे. आमचे ग्राहक अखंडपणे जोडलेले राहतील हे या वाढीमुळे सुनिश्चित केले जाणार आहे आणि त्यायोगे ग्राहकांना वास्तविक काळात (रिअल-टाइममध्ये) कार्यक्रमाची उत्साही ऊर्जा टिपता येईल आणि इतरांना त्यात सहभागी करून घेता येईल.”

बीसीसीआयच्या नियमावर कपिल देवची ‘बोलंदाजी’

मुंबई शहरात अखंड आणि सर्वत्र आढळणारा नेटवर्क अनुभव देता यावा म्हणून विमानतळ, रेल्वे स्थानके, महत्वपूर्ण ठिकाणे, ज्यात सामील आहेत मरीन ड्राइव्ह, नरिमन पॉइंट, चर्चगेट रेल्वे स्टेशन, मरीन लाइन स्टेशन आणि गेट वे ऑफ इंडिया, अशा प्रमुख ठिकाणी व्यापक नेटवर्क अनुकूल करण्याचे आयोजन केले गेले आहे. शहरातील ओबेरॉय (ट्रायडंट) आणि ताज कुलाबा सोबतच सर्व प्रीमियम हॉटेल्स मध्ये सुद्धा कव्हरेज वाढविण्यासाठी व्यापक नेटवर्क मूल्यांकन करण्यात आले आहे.

आयपीएलच्या ‘भागिदारी’त कोहलीचाच ‘विराट’ सहभाग

एअरटेलने खास करून आय.पी.एल साठी पावले उचलली आहेत व देशातील सर्व स्टेडियममध्ये आपले नेटवर्क वाढवले आहे जेणेकरून मार्चपासून सुरू होऊन मे २०२५ पर्यंत सुरू राहणाऱ्या क्रिकेट उत्साहासाठी ग्राहकांना उत्तम सेवा देता येईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -