मिळालेल्या माहितीनुसार, अधिक मासातील धोंडे जेवणासाठी सासरच्या मंडळींनी लेक आणि जावयाला घरी बोलावले होते. जावयाला खास भेट देण्यासाठी सासूबाईंनी ५ ग्रॅम सोन्याची अंगठी पिठाच्या धोंड्यात लपवून ठेवली होती. मात्र पाहुणचार आणि गप्पांच्या गडबडीत घरातील मांजराने तो धोंडा खाऊन टाकला.
नवी मुंबई : नवी मुंबईतील (Navi Mumbai) अटल सेतू पुलावरून (Atal Setu Bridge) एका २८ वर्षीय तरुणाने समुद्रात उडी मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर पोलीस, ...
हा प्रकार लक्षात येताच घरात एकच गोंधळ उडाला. मांजराला तातडीने पकडून बांधून ठेवण्यात आले. अंगठी पुन्हा मिळेल या आशेने कुटुंबीयांनी काही दिवस मांजरावर लक्ष ठेवले. दरम्यान, जावयाला संपूर्ण प्रकार सांगून कपड्यांचा आहेर देण्यात आला आणि अंगठी नंतर देण्याचे आश्वासन देण्यात आले.
चार दिवस उलटल्यानंतरही अंगठी मिळाली नाही. त्यामुळे मांजराला पशुवैद्यकीय रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी उपचार करून अंगठी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र उपचारादरम्यान मांजराचा मृत्यू झाला.
यानंतर डॉक्टरांनी मृत मांजराच्या पोटाची तपासणी केली असता त्यामध्ये सोन्याची अंगठी आढळून आली. अखेर अंगठी परत मिळाली, मात्र त्यासाठी मांजराचा जीव गेला. या विचित्र घटनेची परिसरात मोठी चर्चा रंगली असून जावयासाठी ठेवलेला सोन्याचा आहेर आणि मांजराची ही कहाणी अनेकांना आश्चर्यचकित करत आहे.






