Friday, April 25, 2025
Homeक्रीडाआयपीएलच्या ‘भागिदारी’त कोहलीचाच ‘विराट’ सहभाग

आयपीएलच्या ‘भागिदारी’त कोहलीचाच ‘विराट’ सहभाग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये फलंदाजांची भागीदारी महत्त्वाची असते. भागीदारीमुळेच संघ मोठा खेळ करू शकतो. जेव्हा मोठी भागीदारी होते तेव्हा गोलंदाजी संघावर दबाव वाढतो. आयपीएलही याला अपवाद नाही. आयपीएलच्या इतिहासात अशा टॉप-५ जोड्या आहेत ज्यांनी मिळून हजारो धावा केल्या आहेत, पण यंदा एकही जोडी पुन्हा मैदानावर दिसणार नाही. पण त्यांची कामगिरी लीगच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांमध्ये कोरल्या गेल्या आहेत.

इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेआधी भारतीय संघ आणखी २ सामने खेळणार!

१. कोहली-डिव्हिलियर्स : ३१२३ धावा
आयपीएलमध्ये भागीदारीत सर्वाधिक धावा जोडण्याचा विक्रम विराट कोहली आणि एबी डिविलियर्स यांच्या नावावर आहे. २०२० मध्ये ही जोडी शेवटची एकत्र खेळली होती. ७६ डावांमध्ये विराट आणि डिविलियर्स यांनी ४४ च्या सरासरीने ३१२३ धावा जोडल्या आहेत. त्यांची सर्वात मोठी भागीदारी २२९ धावांची आहे.

आयपीएलची आजपासून ऑनलाईन तिकीटविक्री

२. कोहली-गेल : २७८७ धावा
२०११ ते २०१७ या कालावधीत विराट कोहली आणि ख्रिस गेल यांची जोडी आयपीएलमध्ये चमकदार ठरली. केवळ ५९ डावांमध्ये या दोघांनी ५२.५८ च्या सरासरीने २७८७ धावा केल्या. या जोडीने २०४ धावांची नाबाद भागीदारी देखील केली आहे, जी आयपीएलमधील सर्वोत्तम भागीदाऱ्यांपैकी एक आहे. मात्र, त्यांच्या दमदार कामगिरीनंतरही रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाला आयपीएलचे विजेतेपद मिळवता आले नाही.

Pak vs NZ : पाकिस्तानचा सलग दुसरा पराभव

३. धवन-वॉर्नर : २३५७ धावा
शिखर धवन आणि डेव्हिड वॉर्नर या डावखुऱ्या जोडीने २०१४ ते २०१७ पर्यंत सनरायझर्स हैदराबादकडून एकत्र खेळले. या काळात, संघाने २०१६ मध्ये आयपीएलचे विजेतेपदही पटकाले. धवन आणि वॉर्नर यांनी ५० डावांमध्ये एकत्र फलंदाजी केली आणि ४८ च्या सरासरीने २३५७ धावा केल्या.

४. कोहली-फाफ डू प्लेसिस : २०३२ धावा
विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिसची जोडी आता तुटली आहे. द. आफ्रिकेचा खेळाडू फाफ डू प्लेसिस नवीन हंगामात दिल्ली कॅपिटल्समध्ये सामील झाला आहे. २०२२ मध्ये, तो आरसीबीचा भाग झाला आणि विराटसोबत डावाची सुरुवात करायचा. या जोडीने ४१ डावांमध्ये सुमारे ५० च्या सरासरीने २०३२ धावा जोडल्या.

५. गंभीर-उथप्पा : १९०६ धावा
गौतम गंभीर आणि रॉबिन उथप्पा ही जोडी टॉप-५ आहे. पण हे दोन्ही खेळाडू निवृत्त झाले आहेत. २०१४ मध्ये, या जोडीमुळे केकेआरने आयपीएलचे विजेतेपद जिंकले. २०१४ ते २०१७ या कालावधीत गंभीर आणि उथप्पा यांनी ४८ डावांमध्ये एकत्र बॅटिंग केली. या दरम्यान त्यांनी ४० च्या सरासरीने आणि ५ शतकी भागीदाऱ्या रचल्या. तर या जोडीने एकूण १९०६ धावा जोडल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -