चंद्रपूर : जिल्ह्यातील ८०० भाविक रामलल्लाच्या दर्शनाकरीता रवाना

चंद्रपूर : ज्येष्ठ भाविक नागरिकांना, राज्य तसेच देशातील प्रसिध्द तीर्थक्षेत्राचे दर्शन व्हावे, या उद्देशाने राज्य सरकारने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील ८०० भाविकांना घेऊन विशेष ट्रेन अयोध्येकरीता बुधवारी रवाना करण्यात आली. चंद्रपूर रेल्वे स्थानकावर जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या प्रमुख उपस्थितीत भाविकांना शुभेच्छा देऊन सदर ट्रेन मार्गस्थ झाली. राज्य शासनाच्या आर्थिक सहाय्यातून चंद्रपूर जिल्ह्यातील ८०० भाविकांना अयोध्येतील रामलल्लाचे दर्शन घेता येणार आहे.



राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष व त्यावरील जेष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्री जाण्याची सुप्त इच्छा असते, परंतु गोरगरीब, सर्वसामान्य कुटुंबातील जेष्ठ नागरिक त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे आणि पुरेशी माहिती नसल्याने तीर्थक्षेत्राच्या दर्शनाला जाऊ शकत नाही. ही बाब विचारात घेऊन सर्वसामान्य जेष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थस्थळी जाऊन मन:शांती तसेच अध्यात्मिकतेचे दर्शन व्हावे, यासाठी राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची - दर्शनाची संधी देण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ सुरू करण्यात आली आहे.


त्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण ८०० लाभार्थी श्रीराम मंदिर (अयोध्या) करिता पात्र करण्यात आले. १९ ते २३ मार्च या कालावधीत सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सदर यात्रा पार पडणार आहे. १९ मार्च रोजी चंद्रपूर रेल्वे स्थानाकावरुन यात्रेकरूंना घेऊन सदर रेल्वे २० मार्च रोजी श्रीराम मंदीर अयोध्या येथे पाहोचणार आहे. २१ मार्च रोजी सांयकाळी अयोध्या रेल्वे स्थानकावरुन निघून २३ मार्च रोजी चंद्रपूर येथे पोहोचणार आहे.


भाविकांना शुभेच्छा देतांना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. म्हणाले, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातून आज ८०० लोक अयोध्येला रवाना होत आहे. भाविकांसाठी ही शासनाची महत्वाकांक्षी योजना असून जिल्ह्यातील नागरिकांना रामलल्लाच्या दर्शनाची संधी मिळाली आहे.


यावेळी पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, उपविभागीय अधिकारी संजय पवार, नागपूर येथील सामाजिक न्याय विभागाचे उपायुक्त सिध्दार्थ गायकवाड, सहायक आयुक्त (समाजकल्याण) विनोद मोहतुरे, तहसीलदार विजय पवार, समाजकल्याण विभागाचे दीपक धात्रक, स्मिता बैरमवार, सचिन फुलझेले आदी उपस्थित होते.तत्पुर्वी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने चंद्रपूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांना ओळखपत्र देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. गत महिन्यात ५ ते ९ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत बौध्दगया येथे तीर्थदर्शनाचे नियोजन करण्यात आले होते. यात जिल्ह्यातील २०३ पात्र लाभार्थ्यांनी महाबोधी मंदीर (बौद्धगया) येथे दर्शन घेतले होते.

Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात