रत्नागिरी : चिपळूणच्या वाशिष्ठी नदीपात्रात पोहायला गेलेल्या एका अल्पवयीन तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. गोवळकोट मोहल्ला येथील तलहा मन्सूर घारे (१५) असे या दुर्घटनेतील मृत तरुणाचे नाव आहे.
आज सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. गोवळकोट मोहल्ला येथील तलहा घारे आणि त्याचे अन्य चार मित्र पोहण्यासाठी वाशिष्ठी नदीपात्रामध्ये गेले होते. उकाड्यामुळे हैराण झालेल्या या मुलांनी वाशिष्ठीत पोहण्याचा बेत केला होता. त्यानुसार सायंकाळी ते वाशिष्ठी नदीपात्रात उतरले. मात्र यावेळी वाशिष्ठी नदीच्या उधाणाच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तलहा अल्पवयीन तरुण नदीपात्रात बुडू लागला. आपला मित्र बुडताना पाहून त्याच्यासोबत असलेले इतर मित्र त्यावेळी घाबरून गेले. त्यामुळे त्याला वाचविण्यासाठी कोणीही जाऊ शकले नाही. यावेळी या मुलांनी आरडाओरड केली व मदत मागितली.
यावेळी आजूबाजूच्या नागरिकांनी नदीकिनारी धाव घेत किनार्यावर असलेल्या बोटी सोडून बुडालेल्या तलहाचा शोध घेण्यास सुरुवात केली. याची माहिती पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांना देण्यात आली. तत्काळ घटनास्थळी पोलीस कर्मचारी दाखल झाले. स्थानिक बोटचालकांच्या मदतीने वाशिष्ठी नदीपात्रात मृतदेह शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. अर्ध्या तासानंतर त्याचा मृतदेह वाशिष्ठी नदीपात्रात आढळून आला. यानंतर हा मृतदेह शवविच्छेदनासाठी कामथे उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला
मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…
बंगळुरू : कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक अर्थात माजी डीजीपी ओम प्रकाश यांची राहत्या घरातच हत्या…
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…