प्रशांत दामले यांचा नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

मुंबई : नवीन कार्यकारिणी नियुक्त झाल्यापासून झपाट्याने कामे पूर्ण करण्याचा धडाका लावणारे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष अभिनेते प्रशांत दामले यांनी अचानक पदाचा राजीनामा देत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. मात्र, नाट्य परिषदेच्या कार्यकारिणी मंडळाने दामले यांचा राजीनामा नामंजूर केला.



माटुंगा येथील यशवंत नाट्य संकुलातील अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कार्यालयात सोमवारी नियामक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत अध्यक्ष प्रशांत दामले यांनी राजीनामा देत सर्वांनाच धक्का दिला. नियामक मंडळाच्या सदस्यांनी राजीनामा एकमताने नामंजूर करत तुम्हाला आवश्यक असलेली सर्वतोपरी मदत करू, असे सांगत दामले यांनाच अध्यक्षपदावर कायम राहण्यास सांगितले. याबाबत दामले म्हणाले की, नाटकांच्या प्रयोगांची संख्या वाढल्याने, तसेच आणखी दोन नवीन प्रोजेक्ट येणार असल्याने कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची इच्छा व्यक्त करत मी राजीनामा दिला होता. आता परिषदेचे कामकाज स्थिरस्थावर झाले आहे. सर्व कामे मार्गी लागली आहेत. नाट्य परिषदेची विस्कटलेली घडी पुन्हा नीट बसली आहे. मी माझी जबाबदारी पूर्ण केली. त्यामुळे आता मला मुक्त करा, असे सांगितले; पण कोणीही ऐकायला तयार नव्हते. अध्यक्षपदावर तुम्हीच राहायला हवे. कामाची विभागणी कशी करता येईल ते पाहू, असे नियामक मंडळाचे सदस्य म्हणाले. परिषदेच्या कामाचा ताण घेऊ नका, पण तुम्ही थांबा, असेही मंडळाने सांगितले. सर्वांनी राजीनामा नामंजूर केल्याने त्यांच्या इच्छेसमोर माझे काहीच चालू शकले नाही, असेही दामले म्हणाले.
Comments
Add Comment

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती