Arjit Singh : गायक अरिजीत सिंहने गायलं मराठीतील लोकप्रिय गाणं

पुणे : अरिजीत सिंह (Arjit Singh) हा लोकप्रिय गायक आहे. त्याचे संपूर्ण जगभरात चाहते आहेत. त्याची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. भारतीयांच्या मनात घर करुन असलेला हा गायक आवाजाची जादू पसरवत आहे. आता अरिजीत सिंहनं थेट मराठीतील "जीव रंगला..."हे लोकप्रिय गाणं गायलं आहे. अक्षरश: प्रेक्षकांना मराठी भाषिक वाटावा, या पद्धतीने त्याने हे गाणं गायलंय. अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.


"जीव रंगला..." या गाण्याची अरिजीतलाही भुरळ पडली आहे. अरिजीत सिंह याने नुकतंच पुण्यात कॉन्सर्ट घेतला. यावेळी त्याने मराठीतील लोकप्रिय गाणं "जीव रंगला..." हे गायलं. अरिजीतच्या आवाजात "जीव रंगला..." हे गाणं ऐकून चाहते अक्षरश: ओरडायला लागले. रसिकांमधून एकच जल्लोष पाहायला मिळत आहे. अस्खलित मराठीत अरिजीत "जीव रंगला..." गाणं गाताना दिसत आहे. त्याच्या या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं आहे.





मराठी गाणं आणि तेही अरिजितच्या आवाजात, हे डेडली कॉम्बिनेशन ऐकल्यानंतर मराठी प्रेक्षक तृप्त झालाय. "जीव रंगला..." हे गाणं 'जोगवा' या सुपरहिट मराठी चित्रपटालं आहे. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. हे गाणं प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल आणि गायक हरिहरन यांनी गायलं आहे. या गाण्याची निर्मिती अजय-अतुल यांनी केली होती.



अरिजीतबद्दल बोलायचं झालं तर एका गाण्याच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमावतो. पण, खऱ्या आयुष्यात मात्र त्याला साधं राहायला आवडतं. त्याचं साधं राहणीमान चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असतं. चाहते नेहमीच त्याच्या आवाजाची प्रतीक्षा करत असतात. चाहते त्याला 'किंग ऑफ प्लेबॅग सिंगिंग' असं म्हणतात.

Comments
Add Comment

Sankarshan Karhade : बापासाठी यापेक्षा मोठी कमाई काय असू शकते! संकर्षण कऱ्हाडेने व्यक्त केल्या खास भावना

मुंबई : 'आम्ही सारे खवय्ये' आणि 'माझी तुझी रेशीमगाठ' यांसारख्या लोकप्रिय कार्यक्रमांमधून प्रेक्षकांच्या

Abhishek & Aishwarya ; बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडीचा न्यूयॉर्क मधील फोटो व्हायरल, विभक्त होण्याच्या चर्चांना पूर्णविराम !

मुबई : अलीकडेच, बॉलीवूड मधील प्रसिद्ध स्टार ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन न्यूयॉर्कमध्ये सुट्टी घालवताना दिसले

"तू माझ्या आयुष्यातली सर्वांत कुरूप महिला..."; पतीच्या या बोलण्यावर दिग्गज अभिनेत्रीचा मोठा खुलासा, दोन दशकांपासून राहत आहेत वेगळे

'क्योंकी सास भी कभी बहू थी', 'जमाई राजा' यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून घराघरांमध्ये पोहोचलेल्या दिग्गज आणि

Aishwarya Thackeray : राजकारण नाही, आता रुपेरी पडद्यावर एन्ट्री! बाळासाहेब ठाकरेंचा नातू YRF च्या बिग बजेट चित्रपटात झळकणार

मुंबई : ठाकरे कुटुंबाचा राजकीय वारसा पुढे नेण्याऐवजी अभिनय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा निर्णय

Salman Khan : सलमान खानच्या मध्यरात्रीच्या पोस्टने उडवली खळबळ; 'डर गया... मर गया' म्हणत नेमकं काय सांगितलं?

मुंबई : बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खान (Salman Khan) पुन्हा एकदा सोशल मीडिया (Social Media) पोस्टमुळे चर्चेत आला आहे. दिल्लीतील

Marathi Movie : "मामाच्या गोव्याला जाऊया" चा धमाकेदार ट्रेलर रिलीज; अंकुश चौधरीचा खतरनाक 'डॉन' अवतार अन् तगडी स्टारकास्ट!

बॉलीवूडच्या 'धम्माल'ला देणार टक्कर! 'मामाच्या गोव्याला जाऊया'च्या ट्रेलरमध्ये कॉमेडी, सस्पेन्स अन् ॲक्शनचा