Wednesday, April 23, 2025
HomeदेशThumka Lagao Or Get Suspended : 'नाच नाही निलंबन करतो', बेधुंद नेत्याने...

Thumka Lagao Or Get Suspended : ‘नाच नाही निलंबन करतो’, बेधुंद नेत्याने पोलिसाला सुनावले

पाटणा : नाच नाही निलंबन करतो, या शब्दात एका नेत्याने पोलिसालाच सुनावल्याची धक्कादायक घटना बिहारमध्ये पाटणा येथे घडली. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेज प्रताप यादव यांनी त्यांच्या अधिकृत निवासस्थानी एका पोलिसालाच नाच नाही निलंबन करतो, असे सुनावले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे वादाला तोंड फुटले आहे. ऑन ड्युटी असलेल्या वर्दीतल्या पोलिसाला तेज प्रताप असे कसे सांगू शकतात ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

grenade blast in Amritsar : मंदिराच्या आवारात स्फोट, तीन तरुणांना अटक

व्हायरल व्हिडीओत तेज प्रताप यादव नशेत असल्याचे दिसत आहेत. ते बंगल्याच्या आवारातील मंचावर बसून पोलिसाला ‘नाच नाही निलंबन करतो’ असे सांगताना दिसत आहे. ‘ए सिपाही, ए दीपक, एक गण बजाएंगे उसपे तुमको ठुमका लगाना है. बुरा मत मानो होली है. आज नहीं ठुमका लगाओगे तो सस्पेंड कर दिए जाओगे’ हे तेज प्रताप यादव यांचे वाक्य आहे. तेज प्रताप हे बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचे पुत्र आणि विरोधी पक्षनेते तेजस्वी प्रसाद यादव यांचे सख्खे बंधू तसेच राष्ट्रीय जनता दलचे नेते आहेत.

Chhaava Box Office Collection : छावा चित्रपटाने महिन्याभरात केली एवढी कमाई

तेज प्रताप यांचा व्हिडीओ व्हायरल होताच भाजपा आणि जनता दल युनायटेडच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली. नेत्याने पोलिसाला नाचायला सांगणे हे चुकीचे असल्याचे भाजपा आणि जनता दल युनायटेडच्या नेत्यांनी सांगितले. आधी वडील कायदे त्यांच्या मर्जीने राबवत होते आता मुलगा तसे करताना दिसत आहे. जसा बाप तसा बेटा असा प्रकार सुरू असल्याची टीका भाजपा आणि जनता दल युनायटेडने केली. राष्ट्रीय जनता दलाचा जंगलराजवर विश्वास आहे. यामुळे ते सत्तेत आले तर कायदे धाब्यावर बसवण्याचेच प्रकार घडणार, अशी टीका भाजपाने केली. तर ‘भानावर या तेज प्रताप यादव. सुधारला नाहीत तर कारवाई करावी लागेल. यादव कुटुंबातील वरिष्ठांनी तेज प्रताप यांना समजावून सांगावे’; या शब्दात जनता दल युनायटेडचे प्रवक्ते राजीव रंजन प्रसाद यांनी तेज प्रताप यादव यांना सुनावले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -