Tuesday, April 29, 2025

देशताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

grenade blast in Amritsar : मंदिराच्या आवारात स्फोट, तीन तरुणांना अटक

grenade blast in Amritsar : मंदिराच्या आवारात स्फोट, तीन तरुणांना अटक अमृतसर : पंजाबमधील अमृतसरमध्ये खंडवाला परिसरातील ठाकुरद्वार मंदिराच्या आवारात ग्रेनेडचा स्फोट झाला. या स्फोटामुळे मंदिराच्या भिंतींचे नुकसान झाले तसेच खिडक्यांच्या काचा फुटल्या. सीसीटीव्हीमध्ये ही घटना रेकॉर्ड झाली. पोलिसांनी या प्रकरणातील तीन तरुणांना अटक केली आहे. अटक केलेले तीन तरुण मूळचे बिहारचे रहिवासी आहेत. पोलिसांनी कारवाई केली आणि तरुणांना मंदिराच्या आवारात स्फोट केल्याप्रकरणी अटक केली. अटक केलेल्या तीन जणांची नावं कर्ण, मुकेश आणि साजन अशी असल्याचे पोलीस आयुक्त गुरप्रीत सिंह भुल्लर यांनी सांगितले. हे तरुण बब्बर खालसा इंटरनॅशनल या अतिरेकी संघटनेशी संबंधित होते. अतिरेक्यांना शस्त्रांचा पुरवठा करण्याच्या कामात ते गुंतले होते. या आरोपींना पोलिसांनी बिहारमधील मधेपुरातून अटक केली. अटक केली तेव्हा आरोपी सीमा ओलांडून नेपाळमध्ये प्रवेश करण्याची तयारी करण्यात गुंतले होते. आरोपी पंजाबमध्ये ज्या मंदिराच्या आवारात ग्रेनेड फेकला तिथे जवळच वास्तव्यास होते. मागील काही दिवसांपासून अमृतसरमध्ये पोलिसांनी अमली पदार्थांच्या विरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई सुरू झाल्यापासून आरोपी अस्वस्थ होते. त्यांनी पोलिसांचे लक्ष अमली पदार्थांच्या विरोधातील कारवाईतून दुसरीकडे वळवण्यासाठी ग्रेनेडचा स्फोट केल्याची शक्यता व्यक्त होत आहे. याआधी अमृतसर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. या आरोपींना अमृतसरमध्येच अमली पदार्थांशी संबंधित आरोपात अटक करण्यात आली. अटक केलेल्या आरोपींकडून हेरॉइन जप्त करण्यात आले. आरोपींची चौकशी सुरू झाली त्यावेळी कर्ण, मुकेश आणि साजन यांची नावं पोलिसांना कळली. यातील कर्णचा शोध घेत आलेल्या पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे.
Comments
Add Comment