वॉशिंग्टन डीसी : इराणला बेचिराख करण्याची आणि त्यांची संस्कृती संपवून टाकण्याची धमकी देणाऱ्या अमेरिकेने माघारीचे संकेत दिले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यूएस नेव्ही अर्थात अमेरिकेचे नौदल इराणपासून दूर नेण्याची तयारी सुरू केल्याचे वृत्त आहे. युद्ध थांबवण्यासाठी होर्मुझ सामुद्रधुनीची नाकेबंदी संपुष्टात आणून तणाव दूर करण्यासाठी अमेरिका इराणपासून दूर जाण्याची तयारी करत आहे. अमेरिकेच्या नौदलाने माघार घेतली तर महिन्याभरात होर्मुझमार्गे आधी होत होती त्याच पद्धतीने मोठ्या प्रमाणात जलवाहतूक होऊ शकेल, असा विश्वास इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीने व्यक्त केला आहे.
सिंगापूर : एकेकाळी भारतातील सर्वात यशस्वी एडटेक कंपन्यांपैकी एक असलेल्या 'बायजूस' (Byju's) चे संस्थापक बायजू रवींद्रन यांच्यासाठी आणखी एक मोठा धक्का समोर ...
अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धबंदीसाठी पुढील दोन महिन्यांत अंतिम करार झाला तर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेकडून त्याला बंधनकारक ठराव म्हणून मंजुरी दिली जाईल. सामंजस्य करारानुसार, अमेरिकन सैन्य इराणच्या परिसरातून माघार घेईल आणि नौदल नाकेबंदी उठवली जाईल. या बदल्यात, इराणने एका महिन्याच्या आत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या व्यापारी जहाजांची संख्या युद्धापूर्वीच्या पातळीवर आणण्याचे वचन दिले आहे.
मॉस्को : रशियाने शनिवारी रात्रभर युक्रेनवर जोरदार हल्ले करत हायपरसॉनिक ‘ओरेश्निक’सह चार प्रकारच्या क्षेपणास्त्रांचा वापर केला. मॉस्कोकडून ...
अमेरिका - इराण सामंजस्य करारातील महत्त्वाचे मुद्दे
- अमेरिकेचे सैन्य इराणच्या आसपासच्या भागातून माघार घेईल आणि नौदल नाकेबंदी उठवेल
- इराण एका महिन्याच्या आत सामुद्रधुनीतून होणारी व्यापारी वाहतूक युद्धापूर्वीच्या पातळीवर पूर्ववत आणेल
- करारात लष्करी जहाजांच समावेश नाही
- इराण ओमानसोबत संयुक्तपणे सामुद्रधुनीतील वाहतुकीचे व्यवस्थापन करेल
अमेरिका - इराण युद्ध
अमेरिका आणि इस्रायल या दोन देशांनी २८ फेब्रुवारी २०२६ पासून इराणवर हवाई हल्ले सुरू केले. या हल्ल्यांनीच पश्चिम आशियात नव्या युद्धाला तोंड फुटले. इराणने इस्रायलवर तसेच अमेरिकेच्या आखाती देशांतील तळांवर हवाई हल्ले सुरू केले. एकमेकांचे सामर्थ्य नष्ट करण्याचे प्रयत्न सुरू झाले. युद्धाला तोंड फुटताच होर्मुझ सामुद्रधुनीतील जलवाहतुकीवर प्रतिकूल परिणाम झाला. ही संधी साधत इराणने होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे त्याच्या मर्जीशिवाय जलवाहतूक होणार नाही, असे जाहीर केले. याचा प्रतिकूल परिणाम जागतिक पातळीवर झाला. अनेक देशांमध्ये महागाई उसळली. युद्ध लांबू लागले तसे अनेक देशांतील नागरिकांसाठी जगणे कठीण होऊ लागले. इंधन पुरवठ्यावर प्रतिकूल परिणाम झाला. युद्धादरम्यान एकमेकांचे खच्चीकरण करण्याच्या प्रयत्नात अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्या महत्त्वाच्या तेलसाठ्यांवर तसेच तेल शुद्धीकरण प्रकल्पांवर हवाई हल्ले झाले. यामुळे जागतिक पातळीवर कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला. पण युद्ध थांबण्याची शक्यता वाढल्यामुळे पुढील काही दिवसांत जागतिक पातळीवरचे संकट दूर होण्याची आशा निर्माण झाली आहे.




