मुंबई: जिओच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला अनेक रिचार्ज प्लान्सचे पर्याय मिळतात. कंपनीने नुकताच एक प्लान सादर केला आहे. हा स्पेशल आहे. आम्ही याला स्पेशल यासाठी म्हणतोय कारण याचे फायदे वेगळे आहे. अधिकतर प्लान्समध्ये जिओ हॉटस्टारचे फायदे केवळ मोबाईलसाठी असतात.
म्हणजेच तुम्हाला रिचार्ज प्लानसोबत जिओ हॉटस्टारचे जे सबस्क्रिप्शन मिळते ते तुम्ही टीव्हीवर वापरू शकत नाहीत. दरम्यान, जिओच्या नव्या प्लानसोबत असे नाही. या प्लानला कंपनीने फ्री जिओ हॉटस्टारच्या लेबलसह शो केले आहे.
१०० रूपयांच्या या प्लानमध्ये तुम्हाला डेटासह जिओ हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन फ्री मिळत आहे. हे सबस्क्रिप्शन टीव्ही आणि मोबाईल दोन्हीवर काम करेल. दरम्यान, या प्लानचा वापर करण्यासाठी तुमच्याकडे बेसिक प्लान असणे गरजेचे आहे. तुमच्याकडे बेसिक प्लान नसेल तर तुम्ही ते वापरू शकत नाही.
जिओच्या या प्लानमध्ये तुम्हाला ५ जीबी डेटा आणि ९० दिवसांची व्हॅलिडिटीसाठी जिओ हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन मिळेल. डेटा लिमिट संपल्यानंतर तुम्हाला ६४ केबीपीएसच्या स्पीडने डेटा मिळेल.