Friday, March 21, 2025
Homeताज्या घडामोडीHoli 2025 : पेण तालुक्यामध्ये होळी उत्सवाची धूम!

Holi 2025 : पेण तालुक्यामध्ये होळी उत्सवाची धूम!

प्रचलित गगनचुंबी होळ्यांची जय्यत तयारी

पेण : गणेशोत्सवाप्रमाणेच होळी (Holi 2025) हा देखील कोकणातील महत्वाचा सण समजला जातो. त्यामुळे होळी या सणाची जय्यत तयारी पेणमध्ये सुरू झाली आहे. त्यामध्ये पेण शहरातील कोळीवाड्यातील (Pen Koliwada Holi) व ग्रामीण भागातील गगनचुंबी होळी संपूर्ण रायगड जिल्ह्यात प्रचलित आहेत. खऱ्या अर्थाने होळी सणापासून कोकणातील सणांना (Konkan Holi) सुरुवात होत असते.

Navi Mumbai : बेवारस वाहने, अनधिकृत फेरीवाले विरोधात पालिकेची धडक मोहीम

होळी या सणाची काही दिवसांपूर्वी अगोदरच तयारी सुरू होते. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात होळी उत्सवाच्या आधीच आसपासच्या जंगलात जाऊन सावरीच्या झाडाचे खांब आणले जाते. प्रत्येक भागातील असंख्य तरुण व ग्रामस्थ मिळून हा सावरीचा खांब आणतात. होळीची खरी सजावट असते ती होळीच्या खांबावर उभारण्यात येणाऱ्या मखराची. विविध प्रकारचे मखर तयार करून हे मखर उभारले जातात आणि मखर उभारून या गगनचुंबी होळ्या अगदी कसोटीने उभ्या केल्या जातात. पेण शहरामध्ये (Pen Koliwada Holi) कोळीवाडा, कुंभार आळी, कौडाल तलाव, नंदीमाळ नाका, फणस डोंगरी तर ग्रामीण भागात दादर, जोहे, कळवे, वाशी, खारपाडा, गडब, कासु, जावळी आदी ठिकाणी आकर्षित गगनचुंबी होळ्या उभ्या केल्या जातात.

या होळ्या पाहण्यासाठी फक्त पेण तालुक्यातून नाही तर संपूर्ण रायगड जिल्ह्यातून अनेकजण येत असतात. होळी सण हा फक्त त्याच दिवशी नाही तर होलीकोत्सवाच्या काही दिवस अगोदरपासून आणि नंतर पुढील पाच दिवस रंगपंचमी पर्यंत हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अशा या होळी सणाची जय्यत तयारी पेण शहर (Pen Koliwada Holi) आणि ग्रामीण ठिकाणी जोरदार सुरू असल्याची पहायला मिळत आहे.

होळी हा सण पेणच्या दादर गावामध्ये अगदी गेल्या अनेक दशकांपासून साजरा होत आहे. पूर्वापार चालत आलेली या उत्सवाची परंपरा आम्ही तरुणाईने आजही अशीच सुरू ठेवली असून आपली परंपरागत सण, उत्सव आणि संस्कृती आम्ही यापुढे देखील टिकून ठेवणार आहोत. – राहुल पेरवी, उपसरपंच, दादर – पेण

होळी म्हटलं की पेण कोळीवाड्यात एक वेगळाच उत्साहाचा आणि आनंदाचा वातावरण पहायला मिळतो. अगदी होळी आणण्यापासून ते होळी उत्सव साजरा होईपर्यंत या कोळीवाड्यात एक वेगळाच साज चढलेला पहायला मिळतो. होळीच्या दिवशी सर्व कोळी बांधव आपला पारंपरिक पेहराव करून आणि महिला वर्ग लुगडी, साड्या नेसून अंगभर दागदागिने परिधान करून त्या पारंपरिक ढोलकीच्या तालावर आणि संगीताच्या ठेक्यात होलिकामाते सभोवती नाचगाणी गात आपला आनंद साजरा करत असतात. पेण कोळीवाड्यातील हा आनंदाचा आणि पारंपरिक संस्कृतीचा क्षण पाहण्यासाठी हजारो नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असतात. – गणेश आवास्कर, कोळीवाडा-पेण (Holi 2025)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -