नागरिकांना वापरासाठी रस्ते व पदपथ मोकळे मिळण्यासाठी प्रशासन आक्रमक
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील रस्ते हे रहदारीसाठी तसेच पदपथ नागरिकांसाठी खुले असणे गरजेचे आहे. तथापि अनेक ठिकाणी रस्त्यावर दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहने उभी असल्याचे दिसून येतात. त्याचप्रमाणे रस्त्यालगत व पदपथावर अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे.
POP Ganesh Idol : ‘पीओपी’ मूर्ती संदर्भात अभ्यासगट स्थापन – पंकजा मुंडे
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्यामार्फत नवी मुंबई शहराच्या सुनियोजित व्यवस्थापनाबाबत नियमितपणे आढावा घेतला जात असून त्यामध्ये अशाप्रकारे शहर सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या कुठेही उभ्या असणाऱ्या वाहनांच्या व अनधिकृत व्यवसाय धारकांच्या होणाऱ्या उपद्रवाविषयी चर्चा करण्यात येत असते. या बेवारस वाहनांमुळे शहर स्वच्छतेमध्ये अडथळा निर्माण होत असून या अानुषंगाने आयुक्तांच्या वतीने अतिक्रमण विभाग व विभाग कार्यालये यांना कारवाई करण्याचे निर्देश देण्यात येत असतात.
या सूचना पत्रकांचा कालावधी संपुष्टात येताच संबधित विभाग कार्यालयामार्फत ही बेवारस वाहने जप्त करून टोईंगच्या सहाय्याने क्षेपणभूमी येथे जमा करावीत व त्यावर नियमानुसार पुढील कारवाई करावी असे निर्देश देण्यात आले.
रिक्षाद्वारे ध्वनीक्षेपकामार्फत जनजागृतीपर सूचना करणार
तथापि, या विषयाकडे अधिक गांभिर्याने लक्ष देत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सर्व विभागांचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी यांना महानगरपालिका कार्यक्षेत्रात उभी असलेली बेवारस वाहने यांना महाराष्ट्र महापालिका अधिनियम, १९४९ मधील कलम २३० व २३१ अन्वये विभाग कार्यालयांमार्फत सूचना पत्रक बजावण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच ही बेवारस वाहने त्यांच्या मालकांनी स्वत:हून काढून टाकण्याबाबत अथवा हटविण्याबाबत रिक्षाद्वारे ध्वनीक्षेपकामार्फत जनजागृतीपर सूचना करावी असेही सूचित करण्यात आले आहे.