विरार : पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये राहणाऱ्या एका शिक्षिकेने बारावीचे ओसी विषयाच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी घरी आणल्या होत्या. पण घरात आग लागली. आग लागल्यामुळे बारावीच्या उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या. ही घटना विरारमधील बोळींज नानभाट येथील गंगूबाई अपार्टमेंट येथे घडली.
उत्तरपत्रिका या शाळा आणि महाविद्यालयात (कॉलेज) तपासणे बंधनकारक आहे. हा नियम असूनही शिक्षिकेने निवडक उत्तरपत्रिका घरी आणल्याच कशा हा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच या मुळे ज्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जळाल्या आहेत त्यांच्या निकालावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
POP Ganesh Idol : ‘पीओपी’ मूर्ती संदर्भात अभ्यासगट स्थापन – पंकजा मुंडे