Gaurav Ahuja Arrested : लघुशंका आणि अश्लील चाळे केलेल्या गौरव आहुजाकडून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

पुणे : महागडी मोटार येरवड्यातील शास्त्रीनगर चौकात रस्त्याच्या मधोमध थांबवून लघुशंका आणि अश्लील चाळे केलेल्या गौरव आहुजाने पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्याने मोटारीची ‘नंबरप्लेट’ काढून तिची विल्हेवाट लावली. त्याच्या मोटारीत मद्याची बाटली आणि ग्लास आढळले. पोलिसांनी मोटार व त्यातील वस्तू जप्त केल्या.


पुण्यातून पसार झाल्यानंतर गौरव मनोज आहुजा (वय २५, रा. साठे कॉलनी, टिळक रस्ता) कोल्हापूरला गेला. कोल्हापूरच्या अलीकडे त्याने मोटार लावली. अज्ञात इसम तसेच आरोपीने स्वतःचा बचाव करण्यासाठी ‘नंबरप्लेट’ची विल्हेवाट लावल्याचे उघड झाले. त्यामुळे पुरावा नष्ट केल्याचे कलम वाढविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. आरोपींनी अमली पदार्थाचे सेवन केल्याचेही पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिस निरिक्षक (गुन्हे) विजय ठकार तपास करीत आहेत.



गौरवच्या पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने गौरव आणि त्याचा मित्र भाग्येश प्रकाश ओसवाल (वय २२, रा. प्राइड हाइट्स सोसायटी, मार्केटयार्ड) यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी वकील योगेश कदम यांनी युक्तिवाद केला. ‘गुन्हा करण्यापूर्वी आरोपी कुठे गेले, त्यांनी कोणत्या ठिकाणी अमली पदार्थांचे सेवन केले, त्यांनी कुठे मद्यप्राशन केले याची माहिती आरोपींकडून घ्यावयाची आहे. गुन्हा केल्यानंतर गौरव मोटारीतून कसा, कोणत्या मार्गे आणि कुणासोबत परत आला याचा तपास करण्यात येत आहे. या गुन्ह्यात व गुन्हा केल्यावर पळून जाण्यात त्याला कुणी मदत केली याची माहिती घ्यायची आहे. त्यामुळे आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी द्यावी,’ असा युक्तिवाद त्यांनी केला.

Comments
Add Comment

Jalgoan Crime : बाप की कसाई? जळगावात चौथी मुलगी झाली म्हणून ३ दिवसांच्या चिमुकलीची पाटाने ठेचून हत्या, जळगाव हादरलं!

जळगाव : मुलीला लक्ष्मीचे रूप मानले जाते, पण जळगावच्या जामनेर तालुक्यातील मोराड गावात एका नराधम पित्याने केवळ

दोन वाहनांच्या धडकेत जिवगल मैत्रिणींचा नाहक बळी

सोलापूर: सोलापुरातील मोहोळ तालुक्यात दोन वाहनांच्या धडकेमुळे झालेल्या अपघातावर हळहळ व्यक्त होत आहे. कारण या

Khopoli News : मुलाला शाळेत सोडलं अन्...; नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीवर दिवसाढवळ्या सपासप वार

खोपोली : रायगड जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक केंद्र असलेल्या खोपोली शहरात आज सकाळच्या सुमारास रक्ताचा थरार

आधी निवडणुकीचा गुलाल, मग मुलाला खांदा; नवनिर्वाचित नगरसेवकावर कोसळला दु:खाचा डोंगर

 बीड: निवडणुकीच्या विजयी गुलालात बापाला खांद्यावर घेऊन नाचला आणि मग बापानेच मुलाला खांदा दिल्याची धक्कादायक

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा