Pune Budget 2025 : करवाढ नसल्याचा पुणेकरांना दिलासा! महापालिकेचा १२,६१८ कोटींचा अर्थसंकल्प सादर

पुणे : पुणे महापालिकेचा (Pune Municipality) २०२५- २६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. यंदाचा हा अर्थसंकल्प पुणेकरांना दिलासा देणारा असून यात कोणतीही करवाढ नसलेला पुणे महापालिकेचा १२ हजार ६१८ कोटींचा अर्थसंकल्प (Pune Budget 2025) सादर झाला आहे. पुणे ⁠महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी २०२५ - २०२६ या आर्थिक वर्षासाठीचा १२ हजार ६१८ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यात प्रामुख्याने महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या ३४ गावांसाठी ६२३ कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे.



पुणेकरांना मीटरप्रमाणे पाण्याचे बिल


पुणेकरांना आगामी वर्षात मीटर प्रमाणे पाणी वापराचे बील (Water bill) द्यावे लागणार आहे. पुणे महापालिकेने समान पाणी पुरवठ्याची योजना राबवली आहे. त्याचे काम जवळपास पुर्ण होत आले असल्याने आगामी वर्षात पुणेकरांना पाण्याचे बील मीटर प्रमाणे द्यावे लागणार आहे. ⁠पुराचा फटका बसलेल्या सिंहगड रस्त्यावरील एकता नगरीमधील घरांचे पुनर्वसन महापालिका करणार आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतुद करण्यात आली आहे.



बजेट बारा हजार कोटींचे, प्रस्ताव ३० हजार कोटींच्या विकास कामांचे


बजेटमध्ये आपल्या प्रभागातील विकासकामे अनेक माजी नगरसेवकांनी सुचवली होती. आमदारांनी कामे सुचवली होती. सर्व पक्षातील नेत्यांनी सुचवलेल्या विकास कामांची ही किंमत ३० हजार कोटींवर जात होती. महापालिकेचे बजेट बारा हजार कोटींचा असताना सर्वपक्षीय नेत्यांनी तीस हजार कोटींची विकास कामे सुचवली होती. (Pune Budget 2025)



महापालिकेच्या खात्यात येणार इतकी रक्कम


पुणे महापालिकेला वर्षाकाठी वेगवेगळ्या माध्यमातून रक्कम मिळत असते. यात स्थानिक संस्था करातुन ५४५ कोटी, ⁠जीएसटीमधुन २ हजार ७०१ कोटी, ⁠मिळकत करातुन २ हजार ८४७ कोटी, ⁠बांधकाम विकास शुल्कातुन २ हजार ८९९ कोटी, ⁠पाणीपट्टी मधुन ६१८ कोटी, ⁠शासकीय अनुदान १ हजार ६३३ कोटी, ⁠कर्ज रोखे ३०० कोटी व ⁠इतर ९७५ कोटी रुपये जमा होणार आहेत.



अशी आहे अर्थसंकल्पात तरतूद



  • इमारतींच्या बांधकामासाठी ४९० कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे

  • ⁠रस्त्यांसाठी १ हजार १२६ कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे

  • ⁠नदी सुधारणा योजनेसाठी ३९६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे

  • ⁠आरोग्यासाठी ५६९ कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे

  • ⁠पाणीपुरवठ्यासाठी १ हजार ६६५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

  • ⁠घनकचरा व्यवस्थापनासाठी १४२ कोटींची तरतूद केली आहे

  • ⁠महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या ३४ गावांसाठी ६२३ कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. (Pune Budget 2025)


वर्षभरात होणारी कामे



  • स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका उभारणार आहे

  • ⁠मंहंमदवाडी येथे नवीन क्रीडा संकुल उभारणार आहे

  • ⁠नेहरु स्टेडीयमची सुधारणा करणार

  • ⁠साथ रोगांसाठी प्रयोगशाळा उभारणार

  • ⁠आपत्कालीन कक्ष उभारणार. (Pune Budget 2025)

Comments
Add Comment

Nashik Mayor : ठरलं तर मग! नाशिकमध्ये महापौर भाजपचा होणार, तर उपमहापौर...?

नाशिक : नाशिकच्या राजकारणात आज एक मोठी आणि ऐतिहासिक घडामोड पाहायला मिळाली. नाशिक महानगरपालिकेच्या

मुलतानी बेकरीच्या मालकाने उचलेले टोकाचे पाऊल; सोलापुरात खळबळ

सोलापूर: सोलापुरात एकेकाळी अत्यंत प्रसिद्ध असलेल्या मुलतानी बेकरीचे मालक सुनील मोतीलाल सदारंगानी यांनी

Mumbai Pune Expressway: तिसऱ्या दिवशीही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे जैसे थे..; प्रवाशी हतबल

मुंबई: आज म्हणजेच शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी पहाटेपासूनच मुंबई- पुणे एक्सप्रेस वे वर वाहतूक कोंडी झाल्याने

HSRP Number Plate: वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी; HSRP नंबर प्लेट बसवली नाही तर...

वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी आहे. तुम्ही जर अजूनही तुमच्या गाडीला नवीन नंबरप्लेट बसवून घेतली नसेल तर तुमचे

Jalna Black Magic News: जालन्यात एका हॉटेलसमोर लिंबू आणि बाहुल्या आढळल्या, काळ्या जादूने गावात खळबळ

जालना: जालना जिल्ह्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भोकरदन तालुक्यामध्ये एका अज्ञात महिलेने हॉटेलसमोर

शिवजन्मभूमीचा विकास करणे आमचे भाग्य

जुन्नरला देशातील क्रमांक-१ पर्यटन तालुका करणार एमआयडीसी, आयटी पार्क चांगले रस्ते तयार करून जुन्नरचा कायापालट