मुंबई : महाकरुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांना जिथे ज्ञान प्राप्ती झाली ते बिहारमधील बुद्धगया (Bihar Buddhgaya) जगातील सर्व बौद्धांचे सर्वोच्च श्रद्धास्थान आहे. बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांचे आहे. महाबोधी टेम्पल कायदा रद्द करून महाबोधी महाविहारच्या व्यवस्थापन समितीमध्ये सर्व विश्वस्त बौद्ध धम्माचे नियुक्त करावेत. महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या हा आज ऐतिहासिक धम्म परिषदेत मंजूर ठराव बिहारच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून कळवणार आहे. तसेच लवकरच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात घेण्याचा आपला निर्धार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला.
Central Railway Update : प्लॅटफॉर्म ३०५ मीटरने वाढला; एकूण लांबी ६९० मीटर
श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाच्या ९५ व्या वर्धापन दिनानिमित्त देश-विदेशातील भिक्खू संघाच्या अनुयायांच्या उपस्थितीत रविवारी दि. २ मार्च रोजी नाशिकमधील हुतात्मा अनंत कान्हेरे गोल्फ क्लब मैदानावर बौध्द धम्म परिषद रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेत पार पडली. यावेळी सीमाताई आठवले यांचा सत्कार करण्यात आला. स्वागताध्यक्ष प्रकाश लोंढे, समीर वानखेडे, क्रांती रेडकर यांनीही मनोगत व्यक्त केले. बौध्द भिक्खु संघाने यावेळी बुध्दगया येथील भगवान बुध्दांचे परमपवित्र स्थान बौध्द भिक्खु संघाच्या ताब्यात देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.