मुंबई : मध्य रेल्वेचे (Central Railway) महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे नुकत्याच पूर्ण झालेल्या नॉन-इंटरलॉकिंग (एनआय) कामांची आणि प्लॅटफॉर्म १२ आणि १३ च्या विस्ताराची पाहणी केली. या प्लॅटफॉर्मचा विस्तार हा २४ कोच गाड्या सामावून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण सुधारणा असणार आहे, यामुळे प्रवाशांची सोय आणि कार्यक्षमता वाढेल. प्लॅटफॉर्म ३०५ मीटरने वाढवण्यात आला असून एकूण लांबी ६९० मीटर झाली आहे.
Ravindra Natya Mandir : पु. ल. देशपांडे कला अकादमीमध्ये आता सिने-नाट्यगृह
मध्य रेल्वेने दि. २८ फेब्रुवारी/दि. १ मार्च २०२५ च्या मध्यरात्री ते दि.२ दि.३ मार्च २०२५ पर्यंत प्री आणि पोस्ट नॉन-इंटरलॉकिंग (एनआय) कामांसाठी विशेष ब्लॉक परिचालीत केले होते. या कमिशनिंगमध्ये विद्यमान सीमेन्स-निर्मित इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टममध्ये बदल करण्यात आले आणि ते फक्त दि. १ मार्च २०२५ रोजी रात्री २३:१५ ते दि. २ मार्च २०२५ रोजी रात्री ९:१५ पर्यंत म्हणजे १० तासांच्या विक्रमी वेळेत पूर्ण झाले.