मुंबई : प्रवासवर्णनकार, कादंबरीकार, लेखिका, कवयित्री डॉ. मीना प्रभू यांचे निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या. मागील काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. खासगी रुग्णालयात उपचार घेत होत्या.
डॉ. मीना प्रभू या मूळच्या पुण्याच्या होत्या. लग्नानंतर डॉ. मीना प्रभू लंडनमध्ये स्थायिक झाल्या होत्या. भूलतज्ज्ञ असलेल्या डॉ. मीना प्रभू यांनी लिहिलेल्या प्रवासवर्णनांनी त्यांना लोकप्रियता मिळवून दिली. ‘माझं लंडन’ हे त्यांचे पहिले प्रवासवर्णन. डॉ. मीना प्रभू यांनी १२ पेक्षा जास्त प्रवासवर्णने लिहिली आहेत. ‘माझं लंडन’, ‘इजिप्तायन’, ‘तुर्कनामा’, ‘ग्रीकांजली’, ‘चिनी माती’ अशी अनेक प्रवासवर्णनांची पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. आयुष्यात डॉ. मीना प्रभू यांनी अनेक देशांचा प्रवास केला. या देशांविषयी त्यांनी प्रवासवर्णने लिहिली आहेत. त्यांचे प्रवासवर्णनांवरील लेख विविध वृत्तपत्रे, मासिके यामध्ये प्रकाशित झाले होते.
गोव्यात झालेल्या महिला साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद डॉ. मीना प्रभू यांनी भूषविले होते. त्यांना २०१० चा दि. बा. मोकाशी पुरस्कार, २०११ चा गो. नी. दांडेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मृण्मयी पुरस्कार, २०१२ चा न. चिं. केळकर पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले. त्यांच्या अनेक पुस्तकांना राज्य शासनाचे पुरस्कार मिळाले. त्यांनी २०१७ मध्ये पुण्यात ‘प्रभू ज्ञानमंदिर’ नावाची किंडल लायब्ररी सुरू केली.
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…