Indian Railway : वेटिंग तिकीटावर प्रवास केल्यास दंड! ट्रेन तिकीट बुकिंगचे नवे नियम लागू

  262

मुंबई : भारतीय रेल्वे (Indian Railway) ही देशातील सर्वांत मोठी परिवहन व्यवस्था असून, दररोज लाखो प्रवासी या माध्यमातून प्रवास करतात. नुकतेच भारतीय रेल्वेने तिकीट बुकिंग (Railway Ticket Booking) प्रक्रियेमध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. याबाबत नवी नियमावली जारी केली असून आजपासून नवे नियम लागू करण्यात आले आहेत. जाणून घ्या काय आहेत ते नियम.



अ‍ॅडव्हान्स रिझर्वेशन पीरियड (ARP) मध्ये बदल


भारतीय रेल्वेच्या नवीन नियमांमध्ये सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे अ‍ॅडव्हान्स रिझर्वेशन पीरियड (ARP) १२० दिवसांवरून ६० दिवसांपर्यंत कमी केले आहे. यामुळे प्रवाशांना त्यांच्या यात्रेचे अधिक अचूक नियोजन करण्यास मदत करेल. बहुतेक प्रवासी त्यांच्या प्रवासाचे नियोजन दोन महिन्यांपेक्षा जास्त आधी करत नाहीत, त्यामुळे हा कालावधी व्यावहारिक दृष्टिकोनातून अधिक योग्य ठरणार आहे.



वेटिंग तिकीटसाठी नवे नियम


आतापर्यंत अनेक प्रवासी वेटिंग तिकीटवर रिझर्व्हेशन डब्यात प्रवास करत होते.. यामुळे कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांना गर्दीचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. यामुळे प्रशासनाने आता वेटिंग तिकीट केवळ जनरल डब्यात मान्य असेल, असा निर्णय घेतला आहे.


दरम्यान, वेटिंग तिकीट असलेले प्रवासी केवळ जनरल डब्यात प्रवास करू शकणार आहेत. परंतु जर कोणी वेटिंग तिकीटवर रिझर्व्हेशन डब्यात प्रवास करताना आढळल्यास त्यांना AC कोचसाठी ४४० रुपये तर स्लीपर कोचसाठी २५० रुपये दंड भरावा लागणार आहे.



तत्काल तिकीट बुकिंगमध्ये सुधारणा


प्रवाशांना अंतिम क्षणी तिकीट मिळवून देणाऱ्या तत्काल तिकीट बुकिंग सुविधेतही भारतीय रेल्वेने बदल केले आहेत. नवीन नियमांनुसार तत्काल बुकिंगसाठी वेळ विभागणी करण्यात आली आहे. याआधी सर्व प्रकारच्या तत्काल तिकिटांसाठी एकाच वेळी बुकिंग सुरू होते. मात्र आता AC क्लाससाठी सकाळी १० वाजता तर नॉन-AC क्लाससाठी सकाळी ११ वाजता तत्काल बुकिंग सुरू होईल.


दरम्यान, तत्काल तिकिटांच्या किंमतींमध्येही बदल करण्यात आले आहेत. आता प्रवासाच्या अंतरावर तिकीट किंमत लागू असणार आहे. तथापि, तत्काल तिकिटांवर किमान आणि कमाल मर्यादा कायम ठेवण्यात आली आहे.



रिफंड पॉलिसीमध्ये बदल


भारतीय रेल्वेने रिफंड पॉलिसीमध्ये देखील लक्षणीय बदल केले आहेत. नवीन नियमांनुसार प्रवाशांना ट्रेन रद्द झाल्यास संपूर्ण तिकीट रक्कम परत मिळेल. तसेच ट्रेन तीन तासांपेक्षा जास्त उशीरा धावल्यास प्रवाशांना पूर्ण रिफंड मिळू शकेल.


तसेच यापूर्वी प्रवासी त्यांचे प्रवासाचे नियोजन बदलल्यास रिफंड मिळवू शकत होते, परंतु आता ही सुविधा मर्यादित केली गेली आहे. नवीन नियमांनुसार प्रवासापूर्वी २४ तासांपेक्षा जास्त काळात रद्द केल्यास ५० टक्के रिफंड मिळू शकणार आहे. प्रवासापूर्वी १२-२४ तासांच्या दरम्यान रद्द केल्यास २५ टक्के रिफंड मिळणार आहे. तर प्रवासापूर्वी १२ तासांपेक्षा कमी वेळेत रद्द केल्यास रिफंड मिळणार नाही.



परदेशी पर्यटकांसाठी विशेष सुविधा


परदेशी पर्यटकांसाठी भारतीय रेल्वेने विशेष सुविधा उपलब्ध केली आहे. त्यांच्यासाठी अ‍ॅडव्हान्स रिझर्वेशन पीरियड (ARP) ३६५ दिवस कायम ठेवण्यात आला आहे. तसेच परदेशी पर्यटकांना विशेष पर्यटक कोटा देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे, ज्यामध्ये प्रत्येक ट्रेनमध्ये काही निवडक सीट्स राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या सुविधेमुळे पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल आणि देशात अधिक परदेशी पर्यटक येतील.

Comments
Add Comment

मुंबईत ४ सप्टेंबरपर्यंत आंदोलन करण्याचे जरांगेंचे संकेत!

आंदोलनासाठी एक दिवसाच्या मुदतवाढीनंतर जरांगेची प्रतिक्रिया मुंबई:  मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil )

Ajit Pawar Onion Issue: अजित पवारांवर कांद्याची माळ फेकण्याचा प्रयत्न, 'कांदा' प्रश्नावर संभाजी ब्रिगेड आक्रमक

अहिल्यानगर: आज श्रीगोंदा (ahilyanagar) येथे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit pawar) दिशेने कांद्याची माळ फेकण्याचा प्रयत्न

शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला

संगमनेर : संगमनेर विधानसभेचे शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला झाल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी ७.४०

विरार दुर्घटना : मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहीर

मुंबई : विरार भागात एक इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झालेला आहे, याबद्दल मुख्यमंत्री

Dagdusheth Halwai Ganpati Atharvashirsha : दगडूशेठ गणपतीसमोर ३५ हजार महिलांचे एकत्रित अथर्वशीर्ष पठण; खासदार सुनेत्रा पवारांचीदेखील खास उपस्थिती

पुणे : गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात पुण्यात भक्तिभाव आणि मंत्रोच्चारांच्या गजरात झाली. शहरातील

गडचिरोली जिल्ह्यात चकमक, एवढे जहाल नक्षलवादी ठार

गडचिरोली : महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात सुरक्षा पथक आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत चार जहाल