काठमांडू: शुक्रवारी सकाळी नेपाळमध्ये ६.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला. या भूकंपाचे हादरे संपूर्ण हिमालय परिसरात बसले. भूकंपाचे झटके दोन वेळा बसले. पहिल्यांदा काठमांडूजवळ तर दुसऱ्यांदा भूकंप बिहार बॉर्डरजवळ आला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या माहितीनुसार भूकंपाचे केंद्र नेपाळ होते. दरम्यान, या भूकंपात आतापर्यंत कोणत्याही प्रकारची जिवित अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
Earthquake: नेपाळमध्ये ६.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, पाटणापर्यंत बसले हादरे
